आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘इग्नू’मध्ये महात्मा गांधींच्या विचारांवर अभ्यासक्रम सुरू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - इंदिरा गांधी राष्‍ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या वतीने येत्या शैक्षणिक वर्षापासून गांधीजींच्या विचारांवर आधारित पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमामुळे अध्यासन केंद्रातही नोकरीची संधी प्राप्त होईल.


असा असेल अभ्यासक्रम
दोन वर्षांच्या अभ्यासक्रमात महात्मा गांधी यांनी दिलेला शांतीचा संदेश, सिद्धांत, सत्य, अहिंसेचे विचार आणि स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची माहिती समाविष्ट असेल.


अशी होईल प्रवेश प्रक्रिया
विद्यार्थ्यांनी नजीकच्या इग्नू केंद्राशी अथवा विभागीय केंद्राशी संपर्क साधावा. प्रवेशासाठी 200 रुपये शुल्क भरावे. अधिक माहितीसाठीwww.ignou.ac.inसंकेतस्थळ पाहावे. प्रवेशाची अंतिम तारीख 15 जून राहील.


असा होईल फायदा
वाढती हिंसा, बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव याचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे आणि तो उपयुक्त ठरेल, असे मत इग्नूच्या केंद्राचे संचालक एम. एस. वानखेडे यांनी मांडले.


गांधीजींचे विचार रुजावेत...
जगभरात गांधीजींचे विचार रुजले आहेत. या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी मिळेल. नव्या पिढीला उत्तम ज्ञान देण्यासाठी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.
श्रीराम जाधव, केंद्रप्रमुख, देवगिरी महाविद्यालय