आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयआयएमचा विचार झाल्यास रोष वाढेल, मुनीश शर्मा यांचा इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आयआयएमबाबत मुख्यमंत्री सीएमआयला वेळ देण्याबाबत टाळाटाळ करत आहेत. या अधिवेशनात आयआयएमचा निर्णय होण्याची शक्यता अाहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्याआधी सीएमआयसोबत चर्चा करावी, अशी मागणी सीएमआयचे अध्यक्ष मुनीश शर्मा यांनी केली. आयआयएम औरंगाबादशिवाय इतरत्र गेल्यास सरकारला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला.
गेल्या पाच महिन्यांपासून आयआयएम औरंगाबादला व्हावे यासाठी लढा सुरू आहे. त्यासाठी उद्योजक लोकप्रतिनिधी अशा सर्वच स्तरावरून पाठपुरावादेखील सुरू आहे. मात्र मुख्यमंत्र्यांकडून त्याला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याची नाराजी उद्योजकांनी व्यक्त केली.
अच्छेदिन कसे येणार?
औरंगाबादसाठी आयआयएमची मागणी तांत्रिकदृष्ट्या योग्य आहे. शहरातून तीन जागेचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. सुरुवातीला केवळ औरंगाबाद, नागपूर, मुंबई आणि पुणे कॉरिडोर असा प्रस्ताव जागेबाबत पाठवण्यात आला होता. २०० एकर जमीन, जवळच असणारी विमान तसेच रस्त्याची सुविधा शहरात आहे. गेल्या ३० वर्षांत शहरात राष्ट्रीय स्तरावरची शिक्षण संस्था आलेली नाही. त्यामुळे मराठवाड्याचा मागासलेपणा दूर करण्यासाठी ही संस्था येणे आवश्यक आहे. मराठवाड्याला न्याय नाही मिळाल्यास अच्छे दिन कसे येणार, असा सवाल शर्मा यांनी केला.