आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयआयटी, वैद्यकीय शिक्षक आपल्या दारी, स्टडीअड्डा डॉट कॉम शैक्षणिक संकेतस्थळ सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - स्पर्धेच्या या युगात आपल्या पाल्याने आयआयटी, एनआयटीसारख्या संस्थांमधून इंजिनिअरिंग किंवा चांगल्या महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर बनावे, अशी प्रत्येक आईवडिलांची अपेक्षा असते. बहुतांश पालक जाहिरातींच्या प्रलोभनाला बळी पडून कोचिंग संस्थांमध्ये अव्वाच्या सव्वा शुल्क देऊन पाल्यांसाठी प्रवेश घेतात; परंतु या ठिकाणी निवडीची कोणतीच हमी नसते. फक्त हुशार विद्यार्थीच या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकतात. विशेष म्हणजे हुशार विद्यार्थी मुळातच मानसिकरीत्या सक्षम असतात आणि त्यांना थोड्याच मार्गदर्शनाची गरज असते. त्यामुळे काही दिग्गज कोचिंग संस्था त्यांना १०० टक्के शिष्यवृत्तीही देतात. त्यांच्या अध्यापनासाठी तज्ज्ञ शिक्षक नेमले जातात आणि त्यांचाच निकाल संपूर्ण कोचिंग संस्थेचा निकाल दर्शवला जातो. मात्र, कमकुवत विद्यार्थी भरभक्कम शुल्क देऊनही यशस्वी होत नाहीत. कारण त्यांना योग्य तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळत नाही. नेमकी हीच अडचण लक्षात घेऊन आयआयटीयन्स आणि डॉक्टर्सनी स्टडीअड्डा डॉट कॉम हे शैक्षणिक संकेतस्थळ सुरू केले आहे. या संकेतस्थळावर देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षक ललित सरदाना सरांचे व्हिडिओ लेक्चर्स उपलब्ध केलेले आहेत. या माध्यमातून शिकून अनेक विद्यार्थ्यांनी आपले भविष्य घडवले आहे.
बातम्या आणखी आहेत...