आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • IIT Entrance Result News In Marathi, Aurangabad, Education, Kota, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयआयटीत औरंगाबादचे 33 विद्यार्थी चमकले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आयआयटी-जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेत औरंगाबादेतून 700 विद्यार्थ्यांनी नशीब आजमावले होते. त्यात शहरातील सुमारे 33 विद्यार्थी नॅशनल रँकिंगच्या पहिल्या दीड हजार जणांमध्ये आहेत. या परीक्षेत 7 मुलींनीही घवघवीत यश मिळवले आहे. आयआयटीत प्रवेश मिळणार नाही, त्या विद्यार्थ्यांना आयआयएसटी (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी), आयआयएसईआर (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, एज्युकेशन अँड रिसर्च), आयआयएससी व पेट्रोलियम इंजिनिअरिंगसारख्या शाखांना प्रवेश घेता येणार आहे.
औरंगाबादच्या नारायणा इन्स्टिट्यूटचे 77 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर 12 विद्यार्थ्यांनी नॅशनल रँकिंगमध्ये स्थान मिळवले. गायकवाड क्लासेसचे 13, चाटे क्लासेसचे 4 आणि इतर चार अशा विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. आयआयटीच्या तयारीसाठी औरंगाबादेतून सुमारे 200 विद्यार्थी राजस्थानच्या कोटा येथे जातात. त्यांची माहिती उपलब्ध झालेली नाही. शहरातील पुष्कराज महेंद्र ढाके, अमेय राजगोपाल लोया, अक्षय दुसाद, अर्पित स्वामी या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.