आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबादमध्ये कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना महिला चालवत होती गर्भपात केंद्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- गर्भपाताच्या गुन्ह्याचा तपास करताना पुंडलिकनगर पोलिसांनी आपत भालगाव येथे सुरू असलेल्या अवैध गर्भपात केंद्राचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका नर्सला ताब्यात घेतले आले. या महिलेच्या घरातून विविध वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आले आहे.

 

पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात ‌एका महिलेने सासरच्या मंडळीविरुद्ध हुंड्यासाठी छळ करणे तसेच पाच महिन्यांची गर्भवती असताना अवैधरित्या गर्भपात केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस करीत होते. दरम्यान, या महिलेचा गर्भपात आपत भालगाव येथील एका महिलेकडे करण्यात आल्याची माहिती महिलेने पोलिसांना दिली होती. या माहितीवरून सिव्हिल सर्जन कार्यालयाचे वैद्यकीय पथक व पुंडलिकनगर पोलिसांनी दुपारी छापा टाकला.

 

दोन खोल्यांमध्ये सुरु होते केंद्र

आपत भालगाव येथे दोन मजली इमारतीमागील दोन खोल्यांत हे गर्भपात केंद्र सुरू होते. पोलिसांनी केंद्र चालवणारी महिला ललिता रमेश मुन उर्फ खाडे (वय 40) हिला ताब्यात घेतले. खाडे हिने नर्सींग कोर्स केला आहे, शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये तिने काम केल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनास्थळावरून पोलिसांनी गर्भपाताची औषधी, गोळ्या तसेच इतर वैद्यकीय साहित्य जप्त केले. 

बातम्या आणखी आहेत...