आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१४ वर्षांच्या लढ्यानंतर वादग्रस्त दुर्गा बार बंद; आयुक्तांचा दणका!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिस आयुक्तांचा सत्कार करताना प्रतापगड येथील महिला. - Divya Marathi
पोलिस आयुक्तांचा सत्कार करताना प्रतापगड येथील महिला.
औरंगाबाद - हडको एन-९ मधील प्रतापगड येथील दुर्गा बार अखेर बंद करण्यात आला. या भागातील महिला आणि नागरिक गेल्या १४ वर्षांपासून हा बार बंद करण्यासाठी लढा देत होते. अखेर पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी नियमबाह्य मद्यविक्री केली म्हणून या हॉटेलचा खाद्य परवाना रद्द केला आहे, तर चारच दिवसांपूर्वी राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी या बारचा परवाना रद्द केला होता. बुधवारी या भागातील नागरिकांनी पोलिस आयुक्तांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.

प्रतापगड येथील वस्तीत गेल्या १४ वर्षांपासून हा बार सुरू होता. "दिव्य मराठी'ने देखील नागरिकांच्या या मागणीचा पाठपुरवा केला. रात्री उशिरापर्यंत मद्यपी या बारमध्ये नशा करायचे. रस्त्यावरच लघुशंका करायचे. शिवाय पार्किंगमुळे वाहतुकीलाही अडथळा होत होता. महिलांचे तर या रस्त्याने येणे-जाणे बंद झाले होते. ही सारी व्यथा या महिलांनी पोलिस आयुक्तांसमोर मांडली होती. या वेळी आयुक्तांनी बारचालकाला बोलवून समजही दिली होती. पुन्हा तक्रारी आल्या तर बार बंद करण्याची तंबी दिली होती. तरीही बारविरोधात तक्रारी सुरू राहिल्याने अखेर पोलिस आयुक्तांनी दुर्गा बारचा खाद्य परवाना रद्द केला. त्यापाठोपाठ राज्य उत्पादन शुल्क विभागानेही बारचा मद्य परवाना रद्द केला. हा बार बंद करण्यासाठी चंद्रकला जगताप, कल्पना मोरे, सुरेखा अजगरे, सुनंदा पगारे, शोभा राऊत, बबिता पकाले, भारती आडे, कमल निकाळजे, पुष्पा राठोड यांनी पुढाकार घेतला

काबंद झाला बार ?
या बारची जागा व्यावसायिक नव्हे, तर घरासाठी आहे. केवळ ३०० स्क्वेअर फूट भागातच दारू विक्रीची परवानगी होती. तरीही संपूर्ण २१०० स्क्वेअर फूट भागात मद्यविक्री सुरू होती. याअगोदर डिसेंबर २००१ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी व्ही. राधा यांच्या आदेशाने हा बार बंद झाला होता. मात्र, दोन महिन्यांनंतर बारचालकाने या निर्णयावर स्थगिती आणून तो पुन्हा सुरू केला. मालती सुभाष चव्हाण या जागेच्या मालक असून त्यांनी दुसऱ्या व्यक्तीस हा बार चालवण्यास दिला होता.
बातम्या आणखी आहेत...