आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहीण-भावाच्या वादातून बंगला अन् ३२ घरे पाडली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जालाननगर भागातील मंजुळानगरातील अतिक्रमण करून बांधलेली ३५ घरे आणि एक आलिशान बंगला काही तासांतच जमीनदोस्त करण्यात आला. गुरुवारी ही कारवाई केवळ बहीण-भावाच्या वादातून झाली. मूळ जमीनमालक आणि कब्जेदारांमध्ये समेट झाल्याने न्यायालयाचा बेलीफ आणि पोलिसांच्या तैनातीत ही कारवाई करण्यात आली. दोन एकर दोन गुंठे जागेवरील सर्वच घरे पाडण्यात आली.
जालान नगरनजीकच्या सर्व्हे क्र. २२/२ मधील दोन एकर दोन गुंठे जागेच्या मालकी हक्कावरून वाद सुरू होता. न्यायालयीन आदेशानुसार ही जागा गुणप्रीतसिंग मनजितसिंग पंढेर यांच्या ताब्यात देण्यासाठी न्यायालयीन बेलीफ टी. के. नावकर, अशोक पाथरे, अमोल ठोके मनजितसिंग पंढेर, गुणप्रीतसिंग पंढेर हे गुरुवारी सकाळी पोलिस फौजफाट्यासह मंजुळानगरात दाखल झाले आणि ही कारवाई करण्यात आली.

जमीन मालक हरनामसिंग बिंद्रा यांच्याकडून मंजुळाबाई नागोजीराव भावले यांनी दोन वेळा एक-एक एकर शेती खरेदी केली. त्यानुसार त्यांच्या सातबाऱ्यावर नाव आहे. त्यानंतर त्यांच्या वारसांनी प्लॉट पाडून विकले. दरम्यानच्या काळात हरनामसिंग बिंद्राच्या वारसांनी आपला हक्क दाखवत न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने अचबलगीरसिंग बिंद्राच्या बाजूने निकाल देत डिक्री काढली. ती डिक्री गुरुनामसिंग पंढेर यांनी खरेदी केली होती.

मंजुळानगरात दोन महिन्यांपूर्वीच ही जागा रिकामी करण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला. मात्र, पोलिस स्थानिक नागरिकांमध्ये तणाव निर्माण होऊ नये यासाठी खासदार चंद्रकांत खैरे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नंदकुमार घोडेले यांनी मध्यस्थी केली. मूळ मालक गुरुनामसिंग पंढेर यांची मुले गुणप्रीतसिंग मनजितसिंग यांनी स्वत:कडे ६१ टक्के जागा ठेवून उर्वरित ३९ टक्के जागा कब्जेदार भावले कुटुंबीयांना देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, उर्वरित जागेसाठी रामचंद्र भावले आणि भालचंद्र भावले असे दोन गट असल्याने या दोन्ही गटांत समेट झाला नाही. रामचंद्र भावले यांच्यातर्फे त्यांची मुले कृष्णा भावले, अमर भावले, प्रेम भावले यांनी तडजोडीसाठीचे पूर्ण प्रयत्न केले. पंढेर यांचा जागावाटपाचा प्रस्ताव मान्य करून त्यांनी त्यांच्या हक्कातील जागा सोडून पंढेर यांच्याकडून विक्री खत करून घेतले होते. मात्र, भालचंद्र भावले, संगीता भावले यांनी पन्नास टक्के जागा मिळावी, अशी मागणी कायम ठेवून समझोत्याला विरोध केला होता.

रामचंद्र भावले यांचा बंगला दर्शनी भागात अालिशान असून त्यांना पंढेर यांनी विक्री खत करून दिले होते. असे असले तरीही भालचंद्र भावले, संगीता भावले त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिस आयुक्तांची भेट घेऊन पाडायचे तर न्यायालयाच्या आदेशानुसार सर्वच घरे पाडावीत, अशी मागणी केली. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी रामचंद्र भावले पंढेर या एका गटातील समझोत्याचा विचार करता सर्वच घरे पाडण्याचे आदेश दिले.
पटत नसल्याने गडबड
^रामचंद्र भावले आणि भागचंद भावले हे चुलत भाऊ असून यांच्या वाट्यावर ३९ टक्के जागा आम्हाला ६१ टक्के जागा आली होती; परंतु भागचंद भावले आणि त्यांच्या मुलीत पटले नाही. म्हणून आम्हाला ताबा मिळाला. -गुरप्रीत सिंग पंढेर, जमीनमालक

पंढेर यांनी शब्द फिरवला
^गुरप्रीतसिंग पंढेरयांनी ५० टक्के जागा आमच्या भावले कुटुंबीयांना ५० टक्के पंढेर हे घेतील, असे सांगितले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी शब्द फिरवल्याने आम्ही विरोध केला; मात्र आम्ही जागेचा ताबा सोडणार नाही. -अजय भावले, कब्जेदार

आमच्या चुलत्याला समेट मान्य नव्हता
^आमचा जागेसंबंधी पंढेर यांच्यासोबत आॅक्टोबर रोजी समझोता झाला होता. ६१ टक्के जागा पंढेर यांना, तर ३९ टक्क्यांत आम्ही आणि आमचे चुलत भाऊ भागचंद भावले यांना जमीन देण्यात आली होती; परंतु भागचंद भावले त्यांची बहीण संगीता यांनी विरोध केला. त्यांनी पोलिस आयुक्तांकडे जाऊन विरोध केला. -डाॅ. कृष्णा रामचंद्र भावले, कब्जेदार