आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातारा-देवळाईतील नोटीस मोहीम अवैधच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सातारा देवळाईतील पाठवलेल्या सर्वच नोटिसा अवैध आहेत. घटनास्थळावर किंवा विशिष्ट जागी जाऊन थेट नोटिसा देण्याची कायद्यात तरतूदच नाही, असा सूर विधिज्ञांनी व्यक्त केला आहे.
गेल्या आठवड्यात न.प. कर्मचाऱ्यांनी लोक राहत असलेल्या अपार्टमेंटना अवैध, अतिरिक्त बांधकामप्रकरणी नोटिसा बजावल्या. त्यामुळे दहशतीचे वातावरण पसरले होते. नंतर या नोटिसा बिल्डरांच्या चलाखीमुळे दिल्या गेल्या. दोन वर्षांपासून साताऱ्यात राहणाऱ्यांना काळजी करण्याचे कारण नाही, असे प्रशासक विजय राऊत यांनी स्पष्ट केले. या संदर्भात "दिव्य मराठी'ने काही विधिज्ञांशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी ही माहिती दिली.
कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे लोकांना दिल्या गेलेल्या नोटिसा हा गंभीर प्रकार आहे. त्यावरून प्रशासन किती गांभीर्याने काम करत आहे, हेच कळते, असेही त्यांचे म्हणणे आहे. सातारावासीयांनी दाखल केलेल्या याचिकांवर न्यायालयाने स्पष्टीकरण मागितल्यास नोटिसा रद्द करण्याची प्रक्रिया करावी लागणार आहे, असेही त्यांनी नाव प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले.

तूर्तास र्जवाटप नाही : दरम्यान,साताऱ्यातील नागरिकांनी कर्जासाठी बँकांमध्ये दाखल केलेल्या फायलींचे काय होणार, असाही मुद्दा चर्चेत होता. त्यावर लोकविकास बँकेचे अध्यक्ष अर्जुन गायके म्हणाले की, प्रशासनाने जाहीर केले असले तरी जोपर्यंत न्यायालय अंतिम आदेश देत नाही तोपर्यंत गृहकर्जाचे वाटप करता येणार नाही.