आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक महिन्यानंतर बेकायदा बांधकामांवर हातोडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातील अतिक्रमणे बेकायदा बांधकामांबाबत नगरसेवकांनी हल्लाबोल केल्यानंतर एका महिन्यानंतर सगळी अतिक्रमणे बेकायदा बांधकामे पाडू, असे जाहीर केले. हे करताना गुंठेेवारी वसाहतींतील अनधिकृत बांधकामांवरही कारवाई करण्याचा इशारा दिल्याने नगरसेवकांच्या तोंडचे पाणी पळाले. सावंगी, आडगाव, तिसगाव येथे ग्रामस्थांच्या संमतीनंतर कचरा प्रक्रिया प्रकल्प करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
आज झालेल्या सर्वसाधारण सभेत अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून प्रशासनाची कोंडी करण्याचा सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रयत्न केला. मनपाचे बांधकाम निरीक्षक चिरीमिरी घेऊन अतिक्रमणांकडे कानाडोळा करतात, तक्रारी करूनही कारवाई होत नाही अशा तक्रारी सभागृह नेत्यांपासून जवळपास प्रत्येक नगरसेवकाने केल्या. महापौर त्र्यंबक तुपे यांनीही प्रशासनावर नाराजी व्यक्त करताना वर्षभरापासून आहे त्याच समस्या सभेत मांडल्या जात असल्याचे निदर्शनास आणून दिले. गुंठेवारी भागातील नागरिक गुंठेवारी भरण्यास तयार असून गुंठेवारी शुल्क भरून घेत ही बांधकामे नियमित करावी, असे सूचित करत महापौरांनी अप्रत्यक्षपणे गुंठेवारी भागातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणे योग्य नाही, असे सुचवले.
शहरात डेंग्यूने थैमान घातले असून प्रत्येक भागात डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळत आहे. याचे मात्र महापालिका प्रशासनाला कुठलेही गांभीर्य नसल्याचे मंगळवारच्या सभेत दिसून आले. आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्यासह आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सभेत कागदी घोडे नाचवले. नगरसेवकांनी शहरात फॉगिंग, हातपंप अशी कोणतीच फवारणी होत नसल्याचे निदर्शनास आणून देत आगपाखड केली.

उद्या ठेकेदारही तेच करतील
वैद्यकीयअधिकारी डाॅ. जयश्री कुलकर्णी यांना नियुक्त करणे त्यांचा विशेषाधिकारातून पगार करणे या विषयावरून आज सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला खासकरून आयुक्तांना निशाण्यावर घेतले. आत्मदहनाचा इशारा देताच विशेषाधिकारात पगार दिले जात असतील तर उद्या ठेकेदारही तेच करतील, असे नगरसेवक म्हणाले.
------------------
बातम्या आणखी आहेत...