आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बालोद्यानात झाला व्यसनींचा अड्डा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद: जिल्हाधिकारी कार्यालय आणि विभागीय आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावरील नेहरी बाल उद्यान सध्या व्यसनाधीन लोकांचा अड्डा बनले आहे. विशेष म्हणजे या उद्यानासमोरच पोलिसांची चौकी आहे; पण तरीही हे उद्यान गांजा ओढणारे, मद्यपी यांचा अड्डा बनले आहे. त्यात हे लोक दादागिरी करत असल्यामुळे लोकांमध्ये त्यांची दहशतही निर्माण झाली आहे.
शहरातील जुन्या उद्यानांपैकी एक म्हणजे नेहरू बाल उद्यान. बहुतांश महत्त्वाची शासकीय कार्यालये या उद्यानाजवळ आहेत. सकाळी परिसरातील ज्येष्ठ नागरिक, लहान मुले व्यायाम आणि वॉकिंगसाठी याठिकाणी येत असतात; पण दुपारनंतर मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळते. दारू पिणारे, गांजा ओढणारे व्यसनाधीन हे दिवसभर या उद्यानाचा ताबा घेतात. अशा उपद्रवींचा बंदोबस्त करण्यासाठी पत्र देऊनही त्यादिशेने पोलिसांकडून कोणतेही पाऊन उचलले जात नसल्याचे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.
या उपद्रवींमुळे आणि टपोरी मुलांच्या घोळक्यामुळे स्त्रियांनाही मोठा त्रास होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. उद्यानाजवळच शिवाजी महाराज पुराण वस्तू संग्रहालय आणि सुभेदारी विर्शामगृह आहे. संग्रहलयात येणारे अनेक पर्यटक आणि शाळेच्या सहलीतील मुलेही या उद्यानात येतात. मात्र, या ठिकाणी पाणी पिण्यासारख्या महत्त्वाच्या सुविधांची वानवा आहे. या सर्व बाबींकडे महापालिकेने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिक करत आहेत. तसेच शिवाय खेळणी, लाइट, कारंजे यांचीही दुरवस्था झाल्याने मुलांनी या उद्यानात येऊन करायचे काय? असा प्रश्न पडतो.
- लहान मुलांना खेळण्यासाठी काहीच नाही. तसेच या ठिकाणी येणारी टपोरी मुलेही आम्हाला मारतात. या गोष्टींमध्ये लवकर सुधारणा होण्याची गरज आहे. अजय गायकवाड, विद्यार्थी
- परिसरात मैदान नसल्यामुळे लहान मुलांना खेळण्यासाठी या उद्यानाशिवाय पर्याय नाही; पण याठिकाणी दारू पिणे, गांजा ओढणे असे प्रकार वाढले आहेत. त्याचा लहान मुलांवर वाईट परिणाम होतो. मद्यपी टपोरींचा बंदोबस्त होणे गरजेचे आहे. ईश्वर लाहोटी, ज्येष्ठ नागरिक
मद्यपी टपोरींचा बंदोबस्त करणे गरजेचे काय केले पाहिजे.
लहान मुलांना खेळण्यासाठी असलेल्या उद्यानात व्यसनासारखे प्रकार तत्काळ थांबवण्यासाठी बंदोबस्त तैनात करण्याची गरज आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचा पुढाकार असणे गरजेचे आहे. संरक्षणासाठी लावलेल्या जाळय़ा, दिवे हे चोरट्यांकडून चोरीला जाण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यासाठी सुरक्षारक्षक असणे गरजेचे आहे. तसेच लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी खेळणी, बसवायला हवी.