आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद- शहरातील 46 अधिकृत टॉवरने बुडवलेली रक्कम वनटाइम वसूल करण्यात यावी, प्रत्येक टॉवरकडून 30 हजार रुपये घ्यावेत. तसेच 300 अनधिकृत टॉवरवर कारवाई करण्यास मनपाला मुभा देण्यात आलेली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने हे निर्देश जारी केले आहेत. त्यामुळे मनपा प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.
मनपाच्या सर्वसाधण सभेत प्रत्येक टॉवरसाठी 3 लाख आकारण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. ही रक्कम अवाजवी स्वरूपाची असल्याबाबतच्या विविध मोबाइल कंपन्यांच्या 24 याचिकांवर गुरुवारी एकत्रित सुनावणी घेण्यात आली. त्यापैकी 9 याचिका औरंगाबाद महानगरपालिकेशी संबंधित होत्या. न्या. आर. एन. बोर्डे आणि न्या. एस. एस. शिंदे यांच्या डिव्हिजन बेंचने हा निर्णय दिला असून अनधिकृत टॉवरवर कारवाई करण्याचे सर्वाधिकार मनपाला असल्याचे निकालात नमूद करण्यात आले आहे. नांदेड वाघाळा, अहमदनगर, जळगाव, परभणी आणि औरंगाबाद महानगरपालिका आणि हिंगोली नगर परिषदेसंदर्भात हा निर्णय देण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.