आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बेकायदा पार्किंगने गिळले रस्ते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नियोजनाशिवाय वाढलेले शहर, त्यात इमारतींना पार्किंग नाही. ज्यांना आहे त्यांचा वापर होत नाही. त्यामुळे शहरातील सर्वच रस्ते वाहनांच्या पार्किंगमुळे अरुंद झाले आहेत. वर्दळीच्या वेळी या रस्त्यांवरून प्रवास करणे म्हणजे तारेवरची कसरत झाली आहे. व्यावसायिक, दुकाने, रुग्णालये, बँका, हॉटेल्स, कोचिंग क्लास, वाइन शॉप आणि इतर बाजारपेठांनी पार्किंग गायब करून रस्ते गिळले आहेत. परिणामी शहरभरातील रस्त्यांवर अस्ताव्यस्त वाहने लागतात. मनपाचा नगररचना विभाग अतिक्रमण हटाव विभागाकडे बोट दाखवतो, तर हा विभाग नगररचना विभागाच्या कार्यपद्धतीवरच आक्षेप घेतो. दुसरीकडे शहर वाहतूक विभाग रस्ते दाखवा, कारवाई करू, असा पवित्रा घेत पुढाकार घेणे टाळत आहे. त्यामुळे हा त्रास कायम आहे.

या ठिकाणीही आहे अडचण : टीव्ही सेंटर ते जळगाव रोड, मुंकुंदवाडी ते संघर्षनगर रोड, रामनगर ते प्रकाशनगर, जळगाव रोड ते हर्सुल टी पॉइंट, क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन, गोपाल टी हाऊस ते संत एकनाथ रंग मंदिर, सेव्हन हिल्स ते गजानन मंदिर चौक, मध्यवर्ती बसस्थानक ते मिल कॉर्नर, शाहू महाराज पुतळा ते खडकेश्वर मार्ग, सिंडको एन-६ आविष्कार कॉलनी ते ओम प्राथिमक शाळा, शहानुरमिया दर्गा ते बीड बायपास रोड यासह शहरातील अंतर्गत रस्त्यांवरही बेकायदा पार्किंगची समस्या आहे.

काय म्हणतात जबाबदार
आम्ही रीतसर बांधकाम परवाना दिलेला असतो.पुढील कारवाईसाठी प्रशासकीय विभागालाही नकाशा दिलेला असतो.अवैध बांधकामावर त्यांनी कारवाई करायला हवी.

डी.पी.कुलकर्णी, सहा.नगररचनाकार मनपा.
तुम्ही त्या रस्त्यांची नावे टाका. आम्ही तत्काळ कारवाई करू. आता आमच्या वाहतूक शाखेत काही अडचणी नाहीत. कारवाई करणारंच
अिजत बोऱ्हाडे, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक शाखा

रस्त्यांवर वाहने काढण्याची जबाबदारी शहर वाहतूक शाखेची आहे. पुढील आठवड्यात आम्ही हातगाडी व इतर महनगरपालिका ा कार्यक्षेत्रातील अितक्रमणावर कारवाई करणार आहोत. नगररचना विभागाने बांधकाम केल्यानंतर जरी आमच्याकडे पुढील कारवाईसाठी नकाशे दिले तरी त्यांनी त्यांच्या इमारत निरीक्षकांमार्फत वेळोवेळी सर्व्हे करणे गरजेचे आहे.
शिवाजी झनझन, अितक्रमण हटाव पथक प्रमुख