आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औरंगाबाद - भाड्याने घेतलेल्या सिडको एन- 5 येथील कम्युनिटी सेंटरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याने अवैधपणे सुरू केलेला पूल टेबल काढण्यासाठी पालिका पथक दाखल होणार असल्याचे समजताच त्याआधीच तीन आजी-माजी नगरसेवक दाखल झाले, पण अवैध बांधकाम हटवण्यात अडथळा आणल्यास नगरसेवक पद जाण्याची शक्यता असल्याचे समजताच अरेरावीच्या भाषेवरून ही मंडळी एकदम विनंतीवर आली. त्यानंतर पथकाने अवैध पूल काढून टाकला.
भाजप कार्यकत्याने भाड्याने घेतलेल्या या कम्युनिटी सेंटरच्या वरच्या मजल्यावर अवैधपणे पूल टेबल सुरू असल्याची तक्रार पथकाकडे आली होती. पथकाने शनिवारी पाहणी केली असता परवानगी नसताना हा पूल टेबल बसवल्याचे लक्षात आले होते. विशेष म्हणजे दुसर्या मजल्यावरची जागा मूळ भाडेकरू राहुल चौधरी यांनी तिसर्यालाच चालवण्यासाठी दिली होती. पथकाकडून कारवाई सुरू होण्यापूर्वीच नगरसेवक नारायण कुचे, बबन नरवडे आणि माजी नगरसेवक संजय रिडलॉन येथे दाखल झाले. प्रारंभी त्यांनी अरेरावी केली. नंतर मात्र नरमाईची भूमिका घेत अवधी देण्याची मागणी केली. पथकाने अवधी न देता तो पूल टेबल काढून जप्त केला.
‘भाजप’मधूनच टिप
या सेंटरमध्ये अवैधपणे पूल टेबल चालतो याची माहिती भाजपच्याच कार्यकर्त्याने पालिका पथकाला दिली होतीे. पथकाने कारवाई केल्यानंतर अनेकांनी आनंद व्यक्त केला. त्यामुळे या कारवाईमागे भाजपचे पालिकेतील पदाधिकारीच असावे, असा अंदाज आहे.
भाजप कार्यकर्ते राहुल चौधरी यांनी हे सेंटर भाड्याने घेतले आहे. ते शहराबाहेर असल्यामुळे त्यांना टेबल काढून घेण्यासाठी काही तासांचा अवधी द्यावा, अशी आमची मागणी होती. आम्ही अरेरावी करण्याचा प्रश्नच नव्हता. बबन नरवडे, नगरसेवक, भाजप.
भाडेकरूच्या मुलीने घरमालकाचे डेबिट कार्ड चोरले; मौजमजेसह देवदर्शनही उरकले
मित्रानेच केला मित्राचा ऑनलाइन ‘प्रेमभंग’
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.