आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसडीओ ठोंबरे यांच्या घरात तीन कोटींचे घबाड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जालन्याचे उपजिल्हाधिकारी तथा विशेष भूसंपादन अधिकारी भास्कर पंढरीनाथ ठोंबरे यांच्या सिडकोच्या टाऊन सेंटरस्थित घराच्या झडतीत लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या हाती सुमारे तीन कोटींचे घबाड लागले. त्यात आठ लाखांची बेहिशेबी मालमत्ता आहे. शिवाय ७० तोळे सोने, पाच किलो चांदी, २२ लाख ९० हजारांची एफ. डी. आणि औरंगाबाद येथील सातारा परिसरात पाच भूखंड त्यांच्या नावे आहेत.

जालन्यात विशेष भूसंपादन अधिकारी असताना पाच लाखांची लाच घेताना ठोंबरे यांना रंगेहाथ पकडले होते. १९८३ मध्ये ते तहसीलदार होते. तेव्हापासून २०१० पर्यंतच्या काळात १९९० -९१ आणि १९९६ - ९७ मध्ये त्यांनी आठ लाखांची बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचे निदर्शनास आले. ही मालमत्ता प्रमाण मालमत्तेपेक्षा ६०.९२ टक्के अधिक आहे.
असे आहे घबाड
७० तोळे सोने - पाच किलो चांदी - २२.९० लाखांची एफ.डी - पाच भूखंड
- ८ लाखांची बेहिशेबी मालमत्ता