आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Illegal Relationships And Husband Murder Issue At Aurangabad

अनैतिक संबंधातून खून; दोन जणांना जन्मठेप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अनैतिक संबंधातून पतीचा खून केल्याप्रकरणी पत्नी आणि तिच्या प्रियकराला जन्मठेप आणि बारा हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश एस.जी.शेट्ये यांनी सुनावली आहे. संगीता पांडुरंग शिनगारे आणि नूरशहा याकूबशहा (३०)अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघेही सिल्लोड तालुक्यातील मोढा बुद्रूक येथील रहिवासी आहेत.
२५ मे २००९ रोजी रांजणवाडी शिवारात अनोळखी प्रेत सापडले होते. ते पाडुरंग शिनगारे यांचे असल्याची ओळख पटली. पांडुरंग यांची पत्नी संगीता हिचे नूरशहासोबत अनैतिक संबंध होते. हे संबंध उघड होण्याच्या भीतीने कट रचून पांडुरंग यांचा २४ मे रोजी चाकूने वार करून खून करण्यात आला. घटनेच्या आदल्या दिवशी नूरशहा आणि पांडुरंग यांनी सोबत दारू पिली होती. आरोपीने ज्या ठिकाणाहून चाकूची खरेदी केली त्या व्यक्तीनेदेखील आरोपीला ओळखले. त्यावरूनच खुनाचा उलगडा झाला. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे १२ साक्षीदार तपासण्यात आले. खून केल्याप्रकरणी आरोपींना जन्मठेप तसेच प्रत्येकी २ हजार रुपये दंडाची शिक्षा तर कट रचल्याबद्दल जन्मठेप आणि ३००० रुपये प्रत्येकी दंड तर पुरावा नष्ट केल्याबद्दल सात वर्षे सक्तमजुरी आणि १००० रुपये दंड ठोठावला आहे. सरकार पक्षातर्फे अॅड बी.के.पवार आणि कैलास पवार यांनी काम पाहिले.