आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सव्वा कोटी रुपयांच्या अवैध वाळूसह २० वाहने जप्त; परभणी पोलिसांची कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांकेतिक छायाचित्र. - Divya Marathi
सांकेतिक छायाचित्र.
परभणी- अवैध वाळू वाहतूकीच्या विरोधात धडक कारवाई करत पोलिसांनी तब्बल एक कोटी २० हजार रुपयांच्या अवैध वाळूसह २० वाहने जप्त केली आहेत. जप्त केलेल्या सर्व वाहनांचा व रेतीचा महसूल विभागाकडून पंचनामा करण्यात आला आहे. 
 
अप्पर पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांना पहाटे एकच्या सुमारास मिळालेल्या माहितीवरून पोलिस प्रशासनाने पालम परिसरात ही धडक कारवाई केली. सहायक पोलिस निरीक्षक ननवरे, बी.पी.चोरमले यांच्यासह कर्मचार्यांचे एक पथक तयार करून ते खासगी वाहनाने पालम तालुक्यातील मौजे पारवा शिवारात दाखल झाले. या पथकाने पारवा शिवारातील गायरान जमिनीवरील महसूल विभागाने सील केलेल्या वाळू पट्ट्यातून अवैधरीत्या वाळू चोरून घेवून जात असताना तीन हायवा ट्रक पकडले. अवैधरीत्या वाळू चोरून गाडीत भरण्याच्या तयारीत असलेले अन्य १७ ट्रकही याच ठिकाणी पोलिसांनी पकडले.
 
या धडक मोहिमेची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांनी अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी भोसले आदींना देऊन घटनास्थळी पाचारण केले. या वाहनांचा व रेतीचा पंचनामा महसूल विभागाने केला असता एकूण १५ ब्रास रेती व २० वाहने असा एकूण एक कोटी २० हजार रुपयांचा हा ऐवज असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पालमचे मंडळ अधिकारी विजय बोधले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पालम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
 
बातम्या आणखी आहेत...