आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळूची अवैध वाहतूक; तिघांना पोलिस कोठडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - पैठण पोलिसांनी अटक केलेल्या वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या तीन जणांना न्यायालयाने गुरुवारी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सय्यद फारुख खलील (रा. काहारवाडा, ता. पैठण), सईद अजर कादरी (रा. दारुसल्लाम मोहल्ला, ता. पैठण) आणि सय्यद जियउल्ला अताउल्ला कादरी असे कोठडी सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत.

(एमएच २० टीसी ७२२), (एमएच २० डीई ५६६७) आणि नंबरप्लेट नसलेल्या अन्य एक वाहनातून वाळूची चोरटी वाहतूक करण्यात येत होती. दरम्यान, मिळालेल्या माहितीवरून सहायक पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी विष्णू जगन्नाथ गायकवाड, फिरोज दोस्तखाँ पठाण यांनी मौलाना सहाब दर्गा परिसरात ही वाहने अडवली. या वेळी चालक ही वाहने सोडून पसार झाले. हा प्रकार बुधवारी घडला. पोलिसांनी ही वाहने जप्त केली. यानंतर वाहनचालक-मालकांचा शोध घेऊन सय्यद फारुख खलील, सईद अजर कादरी, सय्यद जियउल्ला अताउल्ला कादरी यांना अटक केली. त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर केले होते.
बातम्या आणखी आहेत...