आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अवैध नळ कनेक्शन तोडा, नसता टॅक्स माफ करा; अवैध कनेक्शनवर कारवाई करण्याची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वॉर्ड क्रमांक 39 राजाबाजार परिसरातील जाधवमंडी बांबू मार्केट येथील एक्स्प्रेस जलवाहिनीवर बेकायदेशीररीत्या नळ कनेक्शन घेण्यात आले आहे. एकीकडे अनेक भागांतील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, तर दुसरीकडे मुख्य जलवाहिनीवर पाण्याचा अपव्यय सुरू आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना पाणी मिळत नसल्याने पायपीट करावी लागत आहे.

सहा महिन्यांपूर्वी घेण्यात आलेल्या नळ कनेक्शनवर काही नागरिकांकडून प्लास्टिकचा पाइप लावून वाहने धुतली जात आहेत. अवैध नळ असून त्याठिकाणीच सरकारी हातपंप बसवण्यात आलेला आहे. सदरील हातपंपाला खूप पाणी असताना नळ घेण्याचे कारण काय, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. काही नागरिकांपुरते हे नळ कनेक्शन असल्यामुळे वाद होत आहे. त्यामुळे चोवीस तास चालणारे नळ कनेक्शन तोडून टाकण्यात यावे, नसता आमची पाणीपट्टी कर माफ करण्यात यावी, अशी मागणी सुषमा रावळ, प्रणिता कुलकर्णी, सुनीता वर्मा, संध्या रांजणीकर, गीता पहाडे, गीता गुराळे, बिल्कीस सय्यद, सुरेखा गुराळे आदींनी केली.

हातपंपाला पाणी असताना चोवीस तास नळ कनेक्शन कशासाठी ?
* बोअरिंगला व हातपंपाला पाणी असताना चोवीस तास नळ कनेक्शन कशासाठी? दुसरीकडे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. त्यांच्यासाठी कनेक्शन दिले पाहिजे. सुषमा रावळ, रहिवासी

* चोवीस तास पाणी राहिल्यामुळे नासाडी होत आहे, हे कुणाच्या लक्षात येत नाही. दुसरीकडे महिलांना पायपीट करावी लागत आहे, तर इकडे पाण्याची नासाडी होत आहे.
प्रणिता कुलकर्णी, रहिवासी

* गरजूंना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, तर उच्चभ्रू लोकांना पाणी मिळत आहे. या प्रकारामुळे वाद वाढत आहेत. अवैधरीत्या घेण्यात आलेला नळ बंद करणे योग्य आहे.
संध्या रांजणीकर, रहिवासी

* चोवीस तास नळाला पाणी येत असल्यामुळे सर्रासपणे पाण्याची नासाडी होत आहे. गरज नसताना अशा नळाचा पाणीपुरवठा खंडित करण्यात यावा.
सुनीता शर्मा, रहिवासी

* काही लोकांपुरता हा नळ घेण्यात आलेला आहे. एका बाजूने प्लास्टिक पाइप लावण्यात येतो. परंतु लहान पाण्याच्या धारेवरच नागरिकांना पाणी भरावे लागते.
सुरेखा गुराळे, रहिवासी

* अवैधरीत्या घेण्यात आलेला नळ तोडण्यात यावा, संबंधितावर कारवाई केली पाहिजे. मुख्य लाइनवर नळ कनेक्शनविषयी चौकशी करण्यात यावी.
गीता गुराळे, रहिवासी