आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोंढ्यात १४ हजारांचा गुटखा पकडला, क्रांती चौक पोलिसांनी केली कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मोंढानाका येथील झांबड हाइट येथील एका गोडाऊनवर गुटख्याच्या माल विक्रीसाठी ठेवण्यात आला होता. याची माहिती क्रांती चौक पोलिसांना खबऱ्याकडून मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून १४ हजारांच्या गुटख्याच्या मालासह आरोपीस अटक केली.
शेख नदीम शेख नईम (वय ३०, रा. मुजफ्फरनगर, हडको कॉर्नर) असे अटक करण्यात आलेल्या गुटखा विक्रेत्याचे नाव आहे. या विषयी अधिक माहिती अशी की, मोंढा नाका परिसरात झांबड हाइट येथील एका गोडाउनवर अवैध गुटखा विक्री करत असल्याची माहिती क्रांती चौक पोलिसांना मिळाली होती. सदरील माहितीवरून क्रांती चौक पोलिस ठाण्याचे फौजदार सय्यद सिद्दिकी यांनी आपल्या पथकासह झांबड हाइट येथील गोडाउनवर रात्री ८.३० च्या सुमारास छापा मारला असता सात हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला. हा व्यवसाय गेल्या वर्षभरापासून सुरू होता, अशीही माहिती समोर येत आहे. शहरात मोठ्या प्रमाणात गुटखाबंदी असतानासुद्धा चोरून गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे बोलले जात आहे. या प्रकाराकडे अन्न औषध प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.