आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीकस्थितीवर तत्काळ उपाययोजना, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद -मराठवाड्यातील पिकांच्या परिस्थितीसंदर्भात आढावा घेणे सुरू आहे. केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांच्याशी चर्चाही झाली. आवश्यक त्या तातडीच्या उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते शनिवारी औरंगाबादेत चिकलठाणा विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते.

मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस पहिल्यांदाच शहरात आले होते. त्यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या मुलीच्या लग्नानिमित्त रहाटकर कुटुंबीयांना शुभेच्छा देण्यासाठी ते आले होते. विमानतळावर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी प्रचंड घोषणाबाजीही केली. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी रत्नसुंदरसुरीश्वर महाराजांचे दर्शन घेतले.

सगळे चांगले होईल : फडणवीस
शिवसेना सत्तेत सहभागी होणार की नाही, याबाबत पत्रकारांनी विचारले असता, ‘सगळे चांगले होईल’ एवढीच प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आमदार अतुल सावे, आमदार हरिभाऊ बागडे, प्रशांत बंब, शहराध्यक्ष बापू घडामोडे, एकनाथ जाधव, शिरीष बोराळकर, किशनचंद तनवाणी यांची उपस्थिती होती.