आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सीबीएसईचे विद्यार्थ्यांसाठी नवे संकेतस्थळ कार्यान्वित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (सीबीएसई) ने शाळेतील विज्ञान विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन प्रॅक्टिलची सुविधा सुरू केली आहे. यात ऑनलाइन प्रॅक्टिकल क्लासबरोबरच विद्यार्थी केवळ केमिकल्सचीच नाही तर केमिकलचे मिश्रण आणि निष्कर्षदेखील पाहू शकतील. यासाठी खास नवे संकेतस्थळ सीबीएसईच्या वतीने सुरू करण्यात आले आहे.
वाढत्या तंत्रज्ञानातील सुविधा आणि बदल लक्षात घेता येणाऱ्या काळात शिक्षणातही अामूलाग्र बदल होणार आहेत. या स्पर्धेसाठी विद्यार्थीही तयार असायला हवेत म्हणून सीबीएसई नवनवीन बदल करत असते. त्याचाच एक भाग म्हणून हे नवे संकेतस्थळ प्रात्यक्षिकातून शिक्षण घेण्यासाठी सुरू करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर ऑनलाइन प्रॅक्टिकल करण्याची पद्धत, त्यासंबंधीची माहिती देण्यात आली आहे. तसेच संकेतस्थळावर ऑनलाइन लॅब कोर्सदेखील उपलब्ध आहे. त्यासाठी शाळांना सीबीएसई संकेतस्थळावर जाऊन रजिस्ट्रेशन करायचे आहे. ही सुविधा नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असेल. ऑनलाइन शिक्षणासाठी सीबीएसईने शिक्षकही नेमले आहेत. विज्ञान शिक्षकांच्या सीडींचा यात वापर करण्यात आला असून हे शिक्षक प्रत्येक प्रयोगाची, प्रत्येक विषयाची सविस्तर माहिती समजावून सांगणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना घरीही अभ्यासात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मदत मिळणार आहे.
बातम्या आणखी आहेत...