मुंबईतील माेर्चाद्वारे सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न
मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांनी यापूर्वीही दावा केला आहे की, मुंबईत काढण्यात येणारा मोर्चा हा मुक मोर्चा असणार नाही तर बोलका मोर्चा असणार आहे. सरकारविरुध्द घोषणाबाजी करुन मुंबई दणाणून सोडू असे समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी याअाधीच जाहीर केले आहे.
मराठा क्रांती मोर्चात फुट पाडण्याचा मुख्यमंत्र्यावर आरोप
15 फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीची पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करण्यात आला होता की, त्यांनी मराठा समाजाला आरक्षणाचे केवळ गाजर दाखवून झूलवत ठेवले. इतकेच नव्हे तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, चंद्रकांत पाटील आणि मुंबई भाजप शहराध्यक्ष आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानूसार मराठा क्रांती मोर्चामध्ये फुट पाडण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे मुंबईत भव्यदिव्य असा मोर्चा काढून राज्य शासनाला मराठा समाजाचा हिसका दाखवू. अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी पत्रकारपरिषदेत मांडली होती.
आतापर्यंतचा सर्वात भव्य मोर्चा
मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांनी जाहीर केले आहे की, मुंबईतला मोर्चा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा मोर्चा असणार आहे. त्यासाठी कुठेही गडबड किंवा मोर्चेकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून नियोजन आणि सकल मराठा समाजाच्या आंदोलनाची काय दिशा असावी? याबद्दल बैठकीत चर्चा होणार आहे. 6 मार्च रोजी मुंबईत मराठा क्रांती मोर्चा धडकणार आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, राज्यभरात झालेल्या मराठा क्रांती मोर्चाचे क्षणचित्रे...