आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतमालाची खरेदी-विक्री शेतकऱ्यामार्फतच, देशभर स्थापन होणार कंपन्या, मल्हाेत्रा यांची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळवून देण्यासाठी देशपातळीवर शेतकऱ्यांच्या कंपन्या स्थापन करून शेतमालाची विक्री करण्याचे धोरण राबवण्याची प्रक्रिया सुरू आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात कपात आणि विक्रीत फायदा व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आयुक्त डॉ. एस. के. मल्होत्रा यांनी "दिव्य मराठी'शी बोलताना दिली.

शेतकऱ्यांच्या मालाला कमी भाव, त्याबाबतची अनिश्चितता याबाबतचे धोरण बदलणार की नाही, याबाबत विचारले असता मल्होत्रा म्हणाले, मराठवाडा असो अथवा देशातला कोणताही भाग, आता शेतमालाला भाव मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांनाच मार्केटिंग करावे लागणार आहे. त्यासाठी १५ ते २० शेतकऱ्यांचा एक गट तयार करून त्या माध्यमातून कंपनी स्थापन केली जाईल. कृषी विभागातर्फे त्यांना सुविधा दिल्या जातील. हा प्रयोग सध्या सुरू आहे. या कंपन्याद्वारेच शेत मालाची खरेदी- विक्री होईल. त्यामुळे खरेदीतही शेतकऱ्यांच्या फायदा होईल. आणि त्यांच्या मालाला चांगला भावही मिळेल.

पीक पद्धतीत बदल हवाच
दुष्काळी परिस्थितीबाबत मल्होत्रा यांनी सांगितले, आम्ही सध्या फक्त माहिती घेत आहोत. संपूर्ण दौरा केल्यानंतर त्याचे आकलन करणे सोपे होईल. पीक पद्धती आणि पाणी वापराची पद्धती कशी बदलता येईल, याचा शेतकऱ्यांनाही विचार करावा लागेल. आजच एका शेतकऱ्याची शेती पाहिली. त्यांच्या शेतात चिकू, मोसंबी आणि आंबा पीक घेतलेआहेत. यामध्ये चिकू हे पावसाचा ताण सहन करणारे पीक आहे. त्यामुळे इथून पुढे अशाच पीक पद्धतीचा अवलंब करावा लागेल. आंतरपिके घेण्याचीही गरज आहे.

ग्लोबल वाॅर्मिंगचा फटका सर्वांनाच
जगभरात ग्लोबल वाॅर्मिंगचा फटका सर्वांनाचा बसला आहे. जलवायू परिवर्तनामुळे देशात अनेक ठिकाणी नुकसान सहन करावे लागत आहे. इथेदेखील त्याचा परिणाम पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी अपुरा पाऊस, तर काही ठिकाणी पुराची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे भारतालासुद्धा त्याचा फटका बसत असल्याचे त्यांनी सांगितले.