आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन विद्यापीठ कायदा विद्यार्थिकेंद्रित असेल, शिक्षणमंत्री विनोद तावडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- ‘महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी अॅक्ट-२०१५’ हा प्रस्तावित कायदा विद्यार्थिकेंद्रित आहे. विद्यापीठांची स्वायतत्ता कायम ठेवतानाच कुलगुरू आणि अधिकार मंडळाच्या कामकाजात ‘समतोल’ राखून सर्वसमावेशक कायदा करण्यात येईल, असे उच्च तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘प्रस्तावित कायद्या’वर उच्चशिक्षण विभागाच्या वतीने नोव्हेंबर रोजी चर्चासत्र आयोजित केले होत. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी व्यासपीठावर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, उच्चशिक्षण संचालक डॉ. डी. आर. माने, आमदार अतुल सावे, आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे, तावडेंचे सल्लागार राजेश पांडे, डॉ. अपूर्वा पालकर, कुलसचिव डॉ. महेंद्र सिरसाठ, सहसंचालक डॉ. प्रशांत मगर उपस्थित होते. तावडे म्हणाले, येत्या हिवाळी अधिवेशनात प्रस्तावित मसुदा मांडण्यात येणार आहे. विधेयकाचा अंतिम मसुदा तयार करण्यापूर्वी तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समिती शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या शिफारशी हरकतींचा विचार करत आहे. त्यासाठीच आयोजित चर्चासत्रात तावडे यांनी ‘पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन’ केले. ते म्हणाले, राज्यघटनेप्रमाणे सामाजिक आरक्षण देण्यात येईल. अधिसभेचे अस्तित्व कायम ठेवतानाच अन्य अधिकार मंडळातही विद्यार्थ्यांना प्रतिनिधित्व देऊ. दबावात कुलगुरूंना काम करण्याची वेळ येऊ नये म्हणून स्वायत्तता अबाधित ठेवण्याची नव्या कायद्यात तरतूद असेल. राज्यातील सर्व विद्यापीठांचे ‘स्टेटस’ समान असावे, महाविद्यालये स्वयंशासित स्वयंअर्थसहायित करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. आ. सतीश चव्हाण म्हणाले, ‘नवीन कायद्यात महाविद्यालयातील भरती प्रक्रिया कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली (सीआरबी) सेंट्रल रिक्रुटमेंट बोर्डाद्वारे करण्याचा निर्णय कायद्यातील तरतुदीनुसार न्यायालयात टिकणार नाही. प्रास्ताविक डॉ. माने यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. मगर यांनी केले. डॉ. सुहास मोराळे यांनी आभार मानले. या वेळी बीसीयूडी संचालक डॉ. के. व्ही. काळे, डॉ. सय्यद अझरुद्दीन, डॉ. प्रल्हाद लुलेकर, डॉ. किशन धाबे, डॉ. सर्जेराव ठोंबरे आदींची उपस्थिती होती.

सूचना आणि हरकतीही
आमदारकाळे, चव्हाण, भाऊसाहेब राजळे, अण्णासाहेब खंदारे, स्मिता चावरे, डॉ. कैलास पाथ्रीकर, डॉ. धर्मराज वीर, डॉ. अंकुश कदम, प्राचार्य डॉ. प्रदीप दुबे, डॉ. अशोक तेजनकर, डॉ. मीना पाटील, डॉ. सतीश देशपांडे, डॉ. सुधीर गव्हाणे, डॉ. लक्ष्मीकांत शिंदे, डॉ. एस. एम. देसरडा, सुनील मगरे, प्राचार्य डॉ. किशोर साळवे, पंडित तुपे, तुकाराम सराफ, कुणाल खरात, अभिजित पंडित, विक्रम खिल्लारे, शौकत पठाण आदींनी सूचना मांडल्या. काहींनी हरकतीही घेतल्या.
‘महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी अॅक्ट-२०१५ या विषयावरील चर्चासत्रात बोलताना शिक्षणमंत्री विनोद तावडे. छाया : रवी खंडाळकर
बातम्या आणखी आहेत...