आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Imprisonment Husband Who Kill His Wife In Ranjangaon

पत्नीला जाळून मारणाऱ्यास जन्मठेप, रांजणगाव शे. येथील घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर- अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून जिवंत पेटवून देणाऱ्या नराधम पतीला येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. ए. कोठेकर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. संदीप हरिभाऊ चव्हाण (२१, रा. रांजणगाव शे., ता. गंगापूर) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे.

संदीप याचे सन २०११ मध्ये संगीता हिच्याशी लग्न झाले होते. लग्नानंतर कामाच्या निमित्ताने तो पत्नी संगीता हिच्यासोबत रांजणगाव शेणपुंजी येथे राहत होता. त्याचे बाहेरच्या महिलांशी संबंध होते. यावरून दोघा पती-पत्नीत वाद होत असे. असाच वाद त्यांच्यात ३० मार्च २०१३ रोजी रात्री झाला होता. त्या रात्री त्याने मोबाइलवरून एका मुलीला फोन लावला व तिच्याशी बोलत असताना संगीता हिने ऐकले. त्यामुळे भांडण झाल्याने संदीपने रॉकेल तिच्या अंगावर टाकून पेटवून दिले होते.