आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इम्रानचे बँक खाते, प्रवासाचा तपशील तपासणे सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद - इसिससाठी काम करण्याच्या संशयावरून राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा आणि एटीएसने वैजापूर येथून ताब्यात घेतलेल्या इम्रान पठाणला मुंबईला नेले असलेे तरी त्याचा लेखाजोखा काय आहे याचा तपास एटीएसने सुरू केला आहे. त्याच्या महाराष्ट्र बँकेत असलेल्या खात्यावर कोणी पैसे टाकले, ऑनलाइन कोणी पैसे टाकले याचा तपास एटीएस करत आहे. सोमवारी दुपारी एक वाजता एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सिडको एन-१ मधील बँकेत जाऊन इम्रानच्या खात्याची सखोल माहिती घेतली. त्याचबरोबर गेल्या वर्षभरात इम्रानने ऑनलाइन काेणत्या खात्यावर पैसे वळते केले, कोणत्या वेबसाइटवरून खर्च केला आदी बाबी तपासात पुढे येत आहेत. सोमवारी दुपारी एक वाजता एटीएसचे दोन कर्मचारी इम्रानच्या खात्याची माहिती घेण्यासाठी सिडको एन-१ मधील मुख्य शाखेत तपासासाठी गेले होते. व्यवस्थापक एस. एस. नाईक यांनी इम्रानच्या खात्याची संपूर्ण माहिती देण्याची विनंती केली. संपूर्ण डाटा मिळाल्यानंतर पुढील कारवाई करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. इम्रानने गेल्या वर्षभरात कोठे आणि कसा प्रवास केला, कोणाशी संपर्क साधला, कोठे मुक्काम ठोकला, हा तपास करण्याची जबाबदारी आता राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने एटीएसवर सोपवली.