आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमआयएमचे आमदार जलील निवडणूक समितीतच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी निवडणूक समितीचा राजीनामा दिला, अशा वावड्या उठवल्या जात होत्या. मात्र, आपण राजीनामा दिलेला नाही. मी निवडणूक समितीतच आहे, असे आमदार इम्तियाज जलील यांनी "दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले.
वांद्रे विधानसभेची पोटनिवडणूक होत असून एमआयएमच्या तेथील उमेदवाराच्या प्रचाराकडे लक्ष देण्याची सूचना पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आमदार इम्तियाज जलील यांना केली आहे. वांद्रेची पोटनिवडणूक एमआयएमने गांभीर्याने घेतली आहे. येथे काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांचे तगडे आव्हान असून त्यासाठी एमआयएमचे नेते आपल्या उमेदवाराच्या प्रचारात गुंतले आहेत. औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी स्थानिक नेतेही काम करत असल्यामुळे आपण वांद्रे येेथे लक्ष केंद्रित केले असल्याचे आ. इम्तियाज जलील यांनी सांगितले. महापालिका निवडणुकीवरही आमचे पूर्ण लक्ष असून इतर स्थानिक नेते काम बघत आहे. निवडणूक समितीतून राजीनामा दिलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.