आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूचे अड्डे चालू ठेवा, शिक्षण संस्था बंद करा, आ. इम्तियाज जलील यांचे राज्यपालांना निवेदन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहागंज आणि पीरबाजारमध्ये शाळा आणि महाविद्यालये आहेत. मात्र या भागात असलेल्या देशी दारूच्या दुकानांमुळे ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात वारंवार विघ्ने येत आहेत. यामुळे ही दारूची दुकाने बंद करण्याबाबत वारंवार निवेदन देऊनही संबंधित अधिकारी लक्ष देत नाहीत. यामुळे आमदार इम्तियाज जलील यांनी वैतागून राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे निवेदन पाठवले असून देशी दारूचे अड्डे चालू ठेवा अन् शिक्षण संस्‍था बंद करा, अशी उपरोधिक मागणी त्यांनी केली आहे.
 
केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने सिगारेट तसेच तंबाखूजन्य पदार्थांच्या विरोधात जाहिरातींच्या माध्यमातून जनजागृती केली जाते. मात्र शासनाने दारूबंदी किंवा दारू विक्रीच्या बाबत धोरण स्पष्ट केलेले नाही. यामुळे जुन्या धोरणांचा फायदा दारू विक्रेते घेत आहेत. औरंगाबाद शहरातील काही दारू विक्री केंद्र शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात असल्यामुळे ते अडचणीचे ठरत आहे. शहागंजमधील देशी दारूचे दुकान शाळेपासून २०० मीटरच्या आत आहे. अशीच स्थिती पीरबाजार भागातही आहे. या दोन्ही दुकानांबाबत काही समाजसेवी संघटना तसेच सुजाण नागरिकांनी संबंधित विभागाकडे तक्रार नोंदवली. मात्र या तक्रारीची दखल संबंधित कार्यालयाकडून घेतली जात नाही. 

शहरातील मध्यवस्तीत असलेल्या या देशी दारूच्या दुकानांमुळे या भागातील रहिवासी तसेच शाळा महाविद्यालयांना त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरातील देशी दारूचे अड्डे अद्यापही बंद करण्यात आलेले नाहीत. यामुळे राज्यपालांनी शिक्षण संस्‍था बंद करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी आमदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. 
बातम्या आणखी आहेत...