आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • In 10 Months, 844 Farmers Committed Suicide In Marathwada

मराठवाड्यात १० महिन्यांत ८४४ शेतकऱ्यांची आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाड्यातअपुरा पाऊस, दुष्काळी परिस्थिती आणि खरिपात झालेल्या नुकसानीमुळे ८४४ शेतकऱ्यांनी मराठवाड्यात या वर्षी आत्महत्या केल्या. धक्कादायक बाब म्हणजे तीन महिन्यांत आत्महत्यांच्या संख्येत वाढ झाली असून या तीन महिन्यांत ३५० शेतकऱ्यांनी मरणाला कवटाळले आहे.

मराठवाड्यात या वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यासमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. राज्य सरकार अनेक उपाययोजना करत असले तरी आत्महत्या होतच आहेत.
बीडजिल्ह्यात जास्त प्रमाण : मराठवाड्यातबीड जिल्ह्यात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. बीड, उस्मानाबाद, परभणी लातूर जिल्ह्यात दुष्काळी स्थिती सातत्याने गंभीर होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रकरणांतही वाढ झाली आहे. बीड जिल्ह्यात आत्तापर्यंत २३८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. लातूरमध्ये ७३, उस्मानाबादमध्ये १२६, परभणी ६३, नांदेड १५१, हिंगोली ३० आणि औरंगाबाद जिल्ह्यात १०६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ८४४ पैकी ५०५ शेतकऱ्यांना आत्तापर्यंत मदत करण्यात आली आहे. तसेच ५३२ शेतकरी मदतीस पात्र ठरले असून १७७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या अपात्र ठरवण्यात आल्या आहेत. तर १३५ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.

दुष्काळाचे संकट गडद : २१जुलैअखेर आत्महत्यांची संख्या ४९४ होती. खरीप हातून गेल्याने २० जुलै ते २० ऑक्टोबरदरम्यान ३५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यावरून दुष्काळाचे संकट किती गडद आहे, याची प्रचिती येते.
पुढे वाचा.. मदत वाटपाची आकडेवारी