आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DMICची जलवाहिनी दीड वर्षात 30 किलोमीटर: समांतर जलवाहिनी अडीच वर्षांत फक्त 2 किमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
औरंगाबाद- औरंगाबाद शहराची तहान भागवण्यासाठी ऑक्टोबर २०१४ मध्ये समांतर जलवाहिनीचे काम सुरू झाले. मे २०१७ अखेरपर्यंत फक्त दोन किलोमीटर जलवाहिनी टाकण्यात आली, तर २०१५ मध्ये डीएमआयसीच्या जलवाहिनी कामास मंजुरी मिळाली. आतापर्यंत ३० किलोमीटर जलवाहिनी टाकण्यात आली आहे. येत्या पाच महिन्यांत उर्वरित काम पूर्ण होऊन नोव्हेंबरमध्ये शेंद्रा डीएमआयसीत जायकवाडी धरणातून पाणी पुरवठा सुरू होणार आहे. 

२०१४ मध्ये औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीला समांतर जलवाहिनीचा ठेका मिळाला. त्यानंतर ही योजनाच वादात अडकली. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. दरम्यानच्या काळात हॉटेल बेंचमार्क आणि फारोळा येथे प्रत्येकी एक किलोमीटर लांबीचे पाइप टाकण्यात आले. दुसरीकडे डीएमआयसीच्या जलवाहिनीचे काम मागून येऊन वेगात झाले. एमआयडीसीचे उपअभियंता डी. एस. परळीकर म्हणाले की, ६० टक्के काम झाले आहे. जमीन अधिग्रहण आणि पर्यावरण विभागाची मंजुरीमुळे थोडासा उशिर झाला. 
 
९०० मि.मि.चा व्यास, ५५ किमी अंतर 
१८४ कोटी खर्चाची डीएमआयसीची जलवाहिनी जायकवाडी येथून शेंद्र्यापर्यंत औरंगाबाद मार्गे नेली असती तर ८४ किलोमीटर लांबीची झाली असती. मात्र, या कामासाठी नियुक्त केलेल्या अभियंत्यांनी अभ्यास करून तिचा मार्ग पैठण, वाहेगाव, गेवराई, बोरगाव तांडा, भालगाव असा केला. त्यामुळे २९ किलोमीटर अंतर तसेच तीन कोटी रुपये प्रती किलोमीटर खर्चही वाचला. 
बातम्या आणखी आहेत...