आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅड. नीलेश घाणेकर यांच्यावरील गोळीबारप्रकरणी तिघांना सशर्त जामीन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- अॅड. नीलेश घाणेकरांवर गोळीबार करणाऱ्या तिघांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश यू. के. तेलगावकर यांनी प्रत्येकी ५० हजारांच्या जात मुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला.
घाणेकर यांच्यावर गोळ्या झाडल्याप्रकरणी २१ मे रोजी गुन्हे शाखेच्या पथकाने नेवासा येथील मुजफ्फर जहागीरदार यास अटक केली. त्यानंतर पोलिस कोठडीत त्याने साथीदार पडेगावातील सय्यद मुजीब आणि समीर पठाण यांची नावे सांगितली. जहागीरदार आणि सय्यद मुजीब यांनी पोलिस कोठडीदरम्यान घाणेकर यांच्या सांगण्यावरूनच कट रचून गोळीबार केला असल्याचे कबूल केले. त्यानंतर या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार घाणेकर यांना २३ मे रोजी अटक करण्यात आली. एका दिवसाच्या पोलिस कोठडीनंतर घाणेकर यांची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली. त्यानंतर त्यांना खंडपीठाने ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर नियमित जामीन मंजूर केला.
दरम्यान, या गुन्ह्यातील मुजफ्फर जहागीरदार, सय्यद मुजीब आणि समीर पठाण हे तिघे न्यायालयीन कोठडीत होते. त्या तिघांनी अॅड. युनूस पठाण, अॅड. अभयसिंग भोसले आणि अॅड. एस. एन. तलवार यांच्यामार्फत जिल्हा सत्र न्यायालयात नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला. या नियमित जामिनावर बुधवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश यू. के. तेलगावकर यांच्यासमोर सुनावणी झाली असता अॅड. अभयसिंग भोसले यांनी घाणेकर यांना खंडपीठाने जामीन देण्यात आला असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने त्या तिघांना प्रत्येक रविवारी गुन्हे शाखेत हजेरी देऊन तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, असे आदेशात म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...