आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन वेळा वाहतूक नियम मोडल्यास परवाना रद्द, पोलिस आयुक्तांचे आदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- वारंवार दंडात्मक कारवाई करूनही वाहतूक नियम पाळणाऱ्या वाहनचालकांवर तीन वेळेस नियम मोडल्यास थेट वाहन परवानाच रद्द करण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे. एक जुलैपासून याची अंमलबजावणी सुरू करणार येईल, असे पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी सांगितले. 
 
या मोहिमेत दुचाकी, चारचाकी वाहन चालकांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी सरकारकडून पंचिंग मशीन मागवण्यात आले आहे. या पंचिंग मशीनमध्ये वाहनचालकाची माहिती नोंदवण्यात येईल. 
 
अशी असेल प्रक्रिया : या कारवाईसाठी पोलिस प्रशासनाने सरकारकडे पंचिंग मशीन मागवले आहेत. नियम तोडणाऱ्या वाहनचालकाने परवाना (लायसन्स) या पंचिंग मशीनमध्ये पंच केले जाईल. पहिल्यांदा नियम मोडताना पकडल्यास परवाना पंच करून सोडून दिले जाईल. दुसऱ्यांदा त्याच वाहनधारकास पकडल्यास त्याच्या वाहनावर पिवळा लाइट लावण्यात येईल.
 
 तिसऱ्यांदा संबंधिताचा परवाना स्कॅन केल्यावर ते आढळले तर त्याचा परवाना जप्त करण्यात येईल आणि त्याच्या वाहनावर लाल लाइट लावला जाईल. परवाना जप्त केलेले वाहन आणि चालकाचा अहवाल आरटीओकडे पाठवून परवाना कायमसाठी किंवा काही ठरावीक काळासाठी रद्द करण्यासाठी शिफारस केली जाईल. 
 
परवाना नसल्यास वाहन जप्त 
परवाना देण्यास वाहनचालकाने टाळाटाळ केली किंवा वाहनचालकाकडे वाहन परवानाच नसेल तर थेट वाहन जप्त करण्याचे आदेश पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी दिले असल्याचे सहायक पोलिस आयुक्त सी. डी. शेवगण यांनी सांगितले. शहरात वाहतुकीला शिस्त लागावी हाच यामागचा उद्देश असल्याचे आयुक्त यादव यांनी स्पष्ट केले. 
बातम्या आणखी आहेत...