आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळात शेतकऱ्यांच्या हाती १०७.२८ कोटी रुपये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जिल्ह्यातील दुष्काळामुळे खरीप हंगाम वाया गेला असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारने १९१.९१ कोटींपैकी १०७.२८ कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यापैकी कन्नड आणि गंगापूर या दोन तालुक्यांत निधीचे वाटप करण्यात आले.
दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात तरतूद केली आहे. त्याचे तालुकानिहाय तहसीलला वाटपही करण्यात आले. कन्नड तालुक्यासाठी १५.८१ कोटी, गंगापूरसाठी १४.५७ कोटींचा निधी देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील १३८२ गावांत दुष्काळ जाहीर करण्यात आला. खरीप हंगामातील लाख ३२ हजार ४०३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून लाख ८० हजार ९१६ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे. नुकसानभरपाईचा निधीही जिल्हा प्रशासनामार्फत तालुक्यांना वितरित करण्यात आला आहे. कापूस पीक वगळून अनुदान वाटप करावे लागणार आहे. शासनाने हा निधी वितरित करत असताना शेतकऱ्यांच्या अाद्याक्षरानुसार बँक खात्यातही रक्कम टाकण्यात येणार आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही अनुदानाची रक्कम जमा होईल. त्यादृष्टीने जिल्हा आणि तालुका प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे. गावनिहाय याद्या तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून या याद्यांचे चावडी वाचन केले जाणार आहे.