आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • In Hearing 657 People Want Satara Municipal Council

मनपाने १८ गावांचा काय विकास केला? सुनावणीत ६५७ जणांना हवीय सातारा नगर परिषद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महानगरपालिकेत समाविष्ट १८ गावांचा विकासच झाला नसल्याने सातारा-देवळाईचासुद्धा महानगरपालिकेत समावेश केला जाऊ नये, असा सूर सोमवारी साताळा-देवळाईतील नागरिकांनी लावून धरला. नगर परिषदेचे अस्तित्व कायम ठेवावे की रद्द करावे, याबाबत मागवलेल्या आक्षेप हरकतींवर सोमवारी जिल्हाधिकारी निधी पांडे यांच्या उपस्थितीत सुनावणी झाली. आठवडाभरात याबाबतचा अहवाल शासनाकडे पाठवला जाईल, अशी माहिती उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी दिली.

एकूण ४३८५ जणांनी आक्षेप नोंदवले होते. त्यापैकी ६५९ जणांनी प्रत्यक्ष सुनावणीत सहभागी होऊन आक्षेप नोंदवले. केवळ दोघांनी सातारा-देवळाईचा मनपात समावेश व्हावा, असे मत नोंदवले. सोमवारी सकाळी साडेदहाला सुनावणीला सुरुवात झाली. ४३८५ जणांनी लेखी आक्षेप घेतले होते. ४३८५ पैकी २७ लोकांनी साताऱ्याचा मनपात समावेश करण्याबाबत मत नोंदवले. पाचशे जणांनी पोस्टाद्वारे आक्षेप नोंदवले.

मनपाने अठरा गावांचे काय केले : सुनावणीतनागरिकांनी मनपाच्या कारभाराचे वाभाडे काढले. मनपात पडेगावसह १८ खेड्यांचा समावेश होऊनही त्या गावांचा मनपाने काय विकास केला, असा सवालही नागरिकांनी केला. शहरातील रस्त्याची दुरवस्था, कचऱ्याच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त आहेत. पाण्याचीही बोंब आहे. त्यामुळे आम्हाला विकासासाठी सातारा-देवळाई नगर परिषदच हवी, अशी भूमिका मांडली. मनपाचे केवळ दोन नगरसेवक असतील तर नगर परिषद झाल्यास २५ नगरसेवक होतील.

सातारा-देवळाईचा विकास नगर परिषदेच्या माध्यमातून करणे शक्य आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या सुविधा मिळू शकतात. मनपा विकास करेल यावर आमचा विश्वास नाही. गोकुळ गांगुर्डे, नागरिक

सातारा-देवळाईचामनपात समावेश झाला तर नियोजनबद्ध विकास करणे शक्य होईल. तसेच आरोग्य, बांधकाम आकृतिबंधाच्या माध्यमातून सुविधा चांगल्या पद्धतीने मिळतील. सुदर्शना जाधव, रहिवासी सातारा-देवळाई

गेल्या२५ वर्षांत महानगरपालिकेने शहरातील रस्ते, कचरा आणि पाण्याची समस्या सोडवली नाही. शहरात कुठेही जा रस्ते खराबच आहेत. त्यामुळे किमान सातारा- देवळाईत विकास करायचा असेल नगरपालिकाच हवी. शेख बाबूलाल, रहिवासी,सातारा-देवळाई

मनपात१८ खेड्यांचा समावेश होऊनही त्या गावांचा काहीच विकास केला नाही. सातारा -देवळाईचीही मनपात गेल्यावर तीच अवस्था होईल. विकासाच्या बाबतीत १५ वर्षे मागे जाईल. मनपाने पाण्याचे खासगीकरण केले आहे. त्याचा साताऱ्यालाही फटका बसेल. रोहन पवार, रहिवासी सातारा

सातारा-देवळाईबाबतसुनावणी पूर्ण झाली असून त्याचा अहवाल आठवडाभरात शासनाला सादर केला जाणार आहे. त्यानंतर सातारा- देवळाईत नगर परिषदेचे अस्तित्व कायम ठेवायचे की नाही याचा निर्णय शासन घेईल. देवेंद्र कटके, उपजिल्हाधिकारी,सामान्य प्रशासन