आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडी धरणात ३१.०४% पाणीसाठा, ९ वर्षांनंतर प्रथमच अाॅगस्टमध्ये भरीव अावक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - जायकवाडी धरणात चार दिवसांपासून वरील धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे पाणीसाठा ३१.२२ टक्क्यांवर आला आहे. मागील वर्षी हाच पाणीसाठा अवघा ५ % होता. चार दिवसांपूर्वीच जायकवाडीतील पाणीसाठा मृतसाठ्यात होता. अजूनही आवक सुरूच आहे.

९ वर्षानंतर प्रथमच : तब्बल ९ वर्षांनंतर प्रथमच ५ आॅगस्टला जायकवाडीतील साठा ३१ टक्क्यांपर्यंत पोहोचला. याआधी सन २००७ च्या ५ आॅगस्टला धरणातील पाण्याचा साठा ६१.४९ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. मधल्या वर्षातील ५ आॅगस्टची स्थिती अशी होती.

पंचांगात असेही साधर्म्य
सन २००७ आणि २०१६ तील पंचांगात असलेले साधर्म्यही लक्षवेधी आहे.
३ आॅगस्ट २००७ ला सू्र्याचा आश्लेषा नक्षत्रात प्रवेश. वाहन होते हत्ती. त्या वेळी रवी, बुध, शुक्र आणि शनी जलनाडीत होते.
२ आॅगस्ट २०१६ ला देखील सूर्याचा आश्लेषा नक्षत्रात प्रवेश. वाहनही हत्ती. जलनाडीत आहेत रवी, बुध, चंद्र, गुरू आणि शुक्र.
* स्रोत - अनंत पंडित गुरुजी
बातम्या आणखी आहेत...