आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • In Loknatya Cleaning The Jagar; Criticising Politicians

लोकनाट्यातून स्वच्छतेवर जागर; राजकारण्यांवर टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - काळच्या सत्रात लोककला प्रकारावर समाजप्रबोधनाचा आजही प्रभाव पाहायला मिळाला. शहरवासीयांना भेडसावणाऱ्या डेंग्यू आणि स्वच्छता, हुंडाबळी, स्त्रीशिक्षण आदी विषयांवर जनजागृती करण्यात आली. सत्तेत झालेला बदल सत्तेसाठी झालेले राजकीय नाट्य यावर केलेल्या भाष्यांनी उपस्थितांना खिळवून ठेवले. औरंगाबादच्या सरस्वती भुवन महाविद्यालयातर्फे डेंग्यू ग्रामीण भागात पाय रोवू पाहणाऱ्या रासायनिक कारखान्यांवर भाष्य करण्यात आले. बीड येथील तुलसी संगणकशास्त्र माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयातर्फे सुशिक्षित बेरोजगारांवर नाट्य सादर करत तरुणांच्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी बीड येथील सावरकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छतेवर सादर केलेल्या विडंबनाने उपस्थितांना खळखळून हसवले.
शास्त्रीयतालवाद्याने रसिक मंत्रमुग्ध : तरुणांचाफारसा कल नसलेल्या शास्त्रीय तालवाद्य प्रकारात कलाकारांनी मृदंग, तबला, पखवाज अशा वाद्यांवर ताल धरत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. सेंट्रल फॅसिलिटी सेंटरमध्ये झालेल्या या कला प्रकारात उपस्थितांची संख्याही मोठ्या प्रमाणात होती. खोलेश्वर महाविद्यालय, अंबाजोगाई येथील महाविद्यालयातील स्पर्धकांनी मृदंगावर ताल धरत कार्यक्रमाची सुरुवात केली. तालवाद्य प्रकारात २३ महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला.
मीमुक्याने आसवे गाळू किती : रविवारी(१४ डिसेंबर) झालेल्या सुगम गायनात शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या "मी मुक्याने आसवे गाळू किती, आज मनाला जाळू किती...' ही गझल सादर केली. रूपक तालात बंदिस्त प्रकारात सादर केलेली गझल स्पर्धेत लक्षवेधी ठरली. कार्यक्रमात भावगीत, भक्तिगीतांनी रसिकांचे मन जिंकले.
एकांकिकेकडे प्रेक्षकांची पाठ
दुपारच्या सत्रात झालेल्या एकांकिकेकडे मात्र प्रेक्षकांनी पाठ फिरवली. अगदी मोजक्या प्रेक्षकांच्या उपस्थितीत एकांकिका पार पडली. एकांकिकेतून "व्हॅलेंटाइन डे'चे वास्तव मांडण्यात आले. बीड येथील बलभीम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी "व्हॅलेंटाइन डे'च्या झालेल्या विद्रूपीकरणावर एकांकिकेचे सादरीकरण केले. व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी सकाळी दिलेले गुलाबाचे फूल संध्याकाळी बलात्कारात परिवर्तित होते. समाजाने नाकारल्यानंतर एक अपंग युवक बलात्कारपीडितेला कसा स्वीकारतो समाजाकडून होणाऱ्या हेळसांडीपासून कसा वाचवतो, याचे अतिशय मार्मिक चित्र विद्यार्थ्यांनी उभे केले.