आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्री मित्राचा खून करून तो सकाळी पोलिस पंचनाम्याचा प्रत्यक्षदर्शी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दोन दिवसांपूर्वी राजनगर भागात १९ वर्षीय तरुणाच्या खुनाचा मंगळवारी उलगडा झाला. मनोजकडे काम करणाऱ्या २० वर्षीय मुलानेच व्हाइटनर पिवून त्याचा खून केल्याचे तपासात समोर आले. ऋषिकेश अर्जुन वायाळ असे आरोपीचे नाव असून त्याला मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

मुकुंदवाडी परिसरातील रेल्वे रुळालगत असलेल्या राजनगर भागात मिनरल वाॅटर व्यवसायिक मनोज अशोक गवळी या १९ वर्षीय तरुण व्यावसायिकाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना रविवारी पहाटे उघडकीस आली. त्याच्यासोबत याच भागातील ऋषिकेश काम करत होता. शनिवारी त्याने अगोदर मनोजच्या डोक्यात दगड घातला आणि त्याच्याच शर्टाने त्याचा गळा आवळला, असे त्याने पोलिसांना सांगितले. विशेष म्हणजे एवढ्या क्रूरपणे मित्राचा खून करून सकाळी पुन्हा पोलिस काय करत आहेत हे पाहण्यासाठी घटनास्थळी उभा राहिला. पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे, सहायक आयुक्त रविकांत बुवा, निरीक्षक नाथा जाधाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक साईनाथ गिते तपास करत आहेत.

यामुळे आला संशय
मृत मनोज याच्या संपर्कात असलेल्या लोकांची पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यात ऋषिकेशचाही सहभाग होता. घटना घडली त्या दोन दिवसांचा दिनक्रम त्याला विचारण्यात आला. मात्र, तो वेळोवेळी त्याचा जबाब बदलत होता. किमान दहा वेळा त्याने त्याचा जबाब बदलला आणि पोलिसांचा संशय बळवला.
बातम्या आणखी आहेत...