आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदतीचे आश्वासन देत पैठणमध्‍ये विवाहितेवर बलात्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण - मदतीचे आश्वासन देत विवाहितेवर दोन नराधमांनी विविध ठिकाणी बलात्कार केल्याची घटना उजेडात आली आहे. याप्रकरणी बलात्कार करणार्‍या दोघांसह त्यांना मदत करणारा एक जण अशा तिघांना पैठण पोलिसांनी अटक केली आहे.

17 ऑगस्टला कंपनीत कामाला लावून देतो म्हणून आरोपी रामेश्वर रावण मुळे याने पीडित महिलेला नाथ मंदिराजवळील लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, तिला काही उमजण्यापूर्वीच रामेश्वर मुळे या आरोपीने शिऊर तालुक्यातील केडगाव येथील त्याचा मित्र अमोल ताटे याला बोलावून पीडित महिलेला त्याच्या ताब्यात दिले. अमोल ताटे या आरोपीने 18 ऑगस्टला सुपा येथील एका लॉजवर या विवाहितेवर बलात्कार केला. घडलेला प्रकार कोणास सांगू नकोस म्हणून धमकी देत सोडून दिले.

पीडित महिला रांजणगाव गणपतीला आली असता शेजारच्या सीटवरील युवकास घडलेला सर्व प्रकार सांगितल्यावर त्या युवकाने पीडित महिलेला पुणे येथील पोलिस चौकीत मदतीसाठी आणले. पीडित मुलीचा विश्वास संपादन केल्यावर तिन्ही आरोपींच्या विरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे प्रकरण पैठण पोलिसांकडे वर्ग केले आहे. या प्रकरणातील तिन्ही आरोपी रामेश्वर मुळे, अमोल ताटे, रमेश गद्रे यांना पैठण पोलिसांनी अटक केली आहे.