आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेच्या मतदारसंघातही भाजपचे वर्षपूर्ती सेलिब्रेशन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंधरा वर्षांच्या विजनवासानंतरच्या सत्तेची वर्षपूर्ती जोरदारपणे सुरू झाली आहे. प्रारंभी भाजपचे आमदार आपल्या मतदारसंघात विविध कार्यक्रम आयोजित करत होते; परंतु आता शिवसेना आमदारांच्या मतदारसंघातही भाजपकडून कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. सेनेचे आमदार भाजपवर नाराज असतानाच या वर्षपूर्ती सेलिब्रेशनमुळे आणखी नाराजी वाढण्याची चिन्हे आहेत.

विधानसभा निवडणुकीत युती झाल्यापासूनच दोन्ही पक्षांत ताळमेळ नाही. त्यातच प्रारंभी भाजपला सेनेने सोबत घेतले नव्हते. काही महिन्यांनी सेना सत्तेत सहभागी झाली. तरीही त्यांच्या मंत्र्यांना फारसे महत्त्व देण्यात येत नाही. आता भाजपचे सरकार स्थापन होऊन एक वर्ष झाले. सेनेला सत्तेत सहभागी होऊन एक वर्ष होण्यासाठी अजून काही महिन्यांचा अवधी आहे. त्यामुळे आताच वर्षपूर्तीचे कार्यक्रम गावोगाव होत असल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे.

आमदार अतुल सावे म्हणाले की, आमचे आमदार त्यांच्या मतदारसंघात त्यांनी केलेली कामे सांगताहेत, तर अन्य मतदारसंघात सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा आम्ही मांडतो. प्रत्येक घराघरांत आम्ही पोहोचतो आहे. संघटना म्हणून आमचे हे काम आहे, यात शिवसेनेला कमी लेखणे किंवा स्पर्धा करणे असे काही नसल्याचे आमदार सावे यांनी सांगितले. हा संघटना म्हणून सुरू केलेला उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले, तर सेना आमदारांनी यावर भाष्य करण्यास नकार दिला.
बातम्या आणखी आहेत...