आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घाणेकर गोळीबारातील दुसरे पिस्तूल जप्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- अॅड. नीलेश घाणेकर गोळीबार प्रकरणातील दुसरे पिस्तूल पोलिसांनी पाच जून रोजी जप्त केले. राजू जहागीरदारचे हस्तक समीर पठाण आणि सय्यद मुजीब यांनी घाणेकरांच्या कारवर गोळीबार केला होता. गोळीबाराच्या गुन्ह्यात पठाण हा सध्या पोलिस कोठडीत असून पोलिसांनी पठाणच्या सांगण्यावरून गंगापूर येथील त्याच्या घराची झडती घेतली असता कपड्यांच्या पेटीत ठेवलेले एक पिस्तूल आणि दोन काडतुसे शनिवारी गुन्हे शाखेने जप्त केली. यापूर्वी मुजीबकडून पोलिसांनी एक पिस्तूल जप्त केले आहे. मात्र या गँगचा म्होरक्या जहागीरदार हा अद्यापही फरारच आहे.
पाच जून रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घाणेकर यांच्या सांगण्यावरून जहागीरदारचे हस्तक पठाण मुजीब यांनी संग्रामनगर उड्डाणपुलाजवळ त्यांच्या स्कोडा कारवर एक, तर शर्टाच्या बाहीच्या बाजूने एक अशा दोन गोळ्या झाडल्या होत्या. या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला जहागीरदारचा मुलगा मुजफ्फर ऊर्फ सोनू आणि नाट्य रचणाऱ्या घाणेकरांना मुजीबला अटक केली होती. मुजीबच्या जबाबानंतर गुन्हे शाखा पोलिसांनी पठाणला अटक केलेली आहे. गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक सुभाष खंडागळे, सहायक फौजदार शेख आरेफ, जमादार नरवडे, शेख नवाब यांनी दोन पंचांसमक्ष पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त केली आहेत.