आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोघा मित्रांच्या मारहाणीत 'त्या' तरुणाचा झाला मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सिल्लेखाना सावरकर चौकादरम्यान मातीच्या ढिगाऱ्यावर बेशुद्धावस्थेत सापडलेल्या खाजा गुजर शाहअली गौरी (१७, रा. देवगिरी कॉलनी) याचा जानेवारीला पहाटे मृत्यू झाला. त्याच्या शरीरावर कोणत्याही खुणा आढळल्या नसल्याने मृत्यूचे गूढ उलगडले नव्हते. परंतु दोन मित्रांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचे क्रांती चौक पोलिसांच्या तपासणीत उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रशांत केशवराव म्हस्के आणि प्रमोद जयवंतराव निर्मल या दोघांना अटक केली.

खाजा गुजर हा अकरावीत शिक्षण घेत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खाजा गुजर हा शहरातील वकील गुजर शाहअली गौरी यांचा मुलगा होता. ३१ डिसेंबरच्या रात्री थर्टीफर्स्ट साजरा करण्यासाठी घराबाहेर पडला. मित्र-मैत्रिणींसोबत बीड बायपास येथील आदित्य हॉटेलमध्ये त्याने पार्टी केली. मद्यप्राशन केल्यानंतर त्यांच्या मैत्रिणी एका लॉजमध्ये थांबल्या. त्यांच्यासोबत थांबण्याचा त्याचा इरादा होता, परंतु प्रशांत प्रमोद यांनी त्याला घरी जाण्यास भाग पाडून घराजवळ सोडून दिले. आपल्याला सोडून ते लॉजमध्ये थांबणार असल्यामुळे त्याने त्यांच्याआधीच लॉज गाठून मैत्रिणीच्या खोलीत प्रवेश केला.त्या वेळी त्याला तेथे पाहून दोघांचा पारा चढला. त्यांच्यात वादावादी झाली. यानंतर दोघांनी त्याला लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची माहिती निरीक्षक गोवर्धन कोळेकर यांनी दिली.

पथकाची कसून चौकशी
मारहाणीचाप्रकार सिल्लेखाना ते सावरकर चौकादरम्यान मातीच्या ढिगाऱ्याजवळ झाला. मारहाणीतच तो बेशुद्ध पडला. घाबरलेल्या दोघांनी त्याला घाटीत हलवले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. कोळेकर त्यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन संबंधितांची कसून चौकशी केली. याप्रकरणी दोघांवर खुनाच्या गुन्ह्याची नोंद क्रांती चौक पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.