आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वानखेडेनगर वॉर्डात एमआयएमकडे लक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वानखेडेनगर वॉर्डाच्या रचनेत बदल होऊन दीड हजार मतदार घटल्याने येथे हिंदू मतदार जास्त आहेत. मात्र, रचनेतील बदलामुळे आणि इच्छुक उमेदवारांना आपल्याच मित्रांकडून होणाऱ्या विरोधामुळे वॉर्डात एमआयएमची चर्चा रंगत आहे.

२०१० मध्ये हा वॉर्ड एससी महिला प्रवर्गासाठी राखीव होता. त्या वेळी सर्वाधिक उमेदवार याच वॉर्डातून उभे राहिले होते. यात ज्योती रूपचंद वाघमारे यांनी अपक्ष उभे राहून सर्वच लहान-मोठ्या पक्षांच्या उमेदवारांना चीत केले होते. ४५९ मतांनी वाघमारे यांनी शहर प्रगतीच्या शोभा कांबळे यांचा पराभव केला होता. नवीन रचनेमुळे थेट दीड हजार मतदान कमी होऊन आता सहा हजार ८० मतदान झाले आहे. वॉर्डात हिंदू प्राबल्य असले तरी दलित आणि मुस्लिमांचे एकगठ्ठा मतदान झाल्यास नगरसेवक हेच मतदार ठरवतील.
वाचा... मागील आकडेवारी