आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दिव्य मराठी’च्या ऑटो एक्पोचे थाटात उद््घाटन, रविवारपर्यंत प्रदर्शन व विक्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- ‘दिव्यमराठी’च्या वतीने सलग तिसऱ्या वर्षी ऑटो एक्स्पो भरवण्यात आला असून यात दुचाकी, चारचाकी आणि व्यावसायिक वाहनांचा समावेश आहे. शहानूरवाडीतील श्रीहरी पॅव्हेलियन तेथे भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे उद््घाटन गुरुवार, १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता झाले. या प्रदर्शनात दुचाकी, चारचाकी आणि कमर्शियल वाहनांची रेलचेल आहे. पहिल्याच दिवशी शहरातील नागरिकांनी या ठिकाणी गर्दी करून प्रचंड प्रतिसाद दिला. 

या ऑटो एक्स्पोचे उद््घाटन अरिहंत होंडाचे संचालक धवल मिश्रीकोटकर यांच्या हस्ते झाले. या वेळी ‘दिव्य मराठी’चे युनिट हेड अमित डिक्कर, निवासी संपादक दीपक पटवे, डोंबिवली नागरी बँकेच्या सहायक महाव्यवस्थापक सुप्रिया बेहरे, बँक ऑफ बडोदाचे विभागीय विपणन अधिकारी संजयकुमार सक्सेना, डी.बी.स्टारचे प्रमुख रूपेश कलंत्री यांची प्रमुख उपस्थिती होती. पाहुण्यांनी यांनी फीत कापून, दीप प्रज्वलन करून उद््घाटन केले. 
बातम्या आणखी आहेत...