आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातातोंडाशी आलेला सोयाबीनचा चार हजार कोटींचा घास पाण्यात, शेतकरी हवालदिल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाैरंगाबाद - सततच्या ४ वर्षांपासून दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या मराठवाड्याला यंदा तर निसर्गाने मुसळधार पावसाने चांगलेच मारले. परतीच्या पावसाने मराठवाड्यात कहर केला असून हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. पाणीटंचाईमुळे सबंध देशपातळीवर नाव गेलेल्या लातूरवर तर आभाळच फाटले. जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होऊन पिकांची वाट लागली. नांदेड, बीडमध्येही काहीशी अशीच अवस्था आहे. मराठवाड्यात सुमारे ६ हजार कोटींपेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाले असून यात सोयाबीनचा आकडा तब्बल ४ हजार कोटींचा आहे. हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांचे पाणावलेले डोळे आता मायबाप सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीकडे लागले आहेत.

पुढे वाचा, बीड जिल्ह्यात १ लाख ९९ हजार हेक्टरवरील क्षेत्र बाधित...
बातम्या आणखी आहेत...