आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार जिल्ह्यांतील परीक्षार्थींचा समावेश; पात्र ५० जणांनाच मिळेल प्रशिक्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राज्यातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना आयएएसच्या परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळावे यासाठी सुरू करण्यात आलेल्या बाळासाहेब ठाकरे आयएएस अकादमीतर्फे आज प्रवेश परीक्षा घेण्यात आली. ३२७ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली
असून त्यातील ५० जणांची पुढील प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार आहे.

शारदा मंदिर कन्या शाळेत रविवारी शिवसेनाप्रणीत शिवविद्या प्रबोधिनीच्या या उपक्रमासाठी ही परीक्षा घेण्यात आली. परीक्षेसाठी औरंगाबाद, जालना, वाशीम, लोणार बुलडाणा येथून विद्यार्थी आले होते. त्यात ५० टक्क्यांहून अधिक मुलींचा समावेश होता. दोन तासांच्या या परीक्षेसाठी शिवसेना, भारतीय विद्यार्थी सेना, युवा सेना शिक्षक सेना यांच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले होते.
रावतेंचीभेट : मोरेश्वरसावे यांच्या निधनानंतर सावे कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आलेल्या परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज परीक्षा केंद्राला भेट देऊन पाहणी केली. त्यांच्यासोबत जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, शहरप्रमुख राजू वैद्य, राजू बागडे, पद्माकर इंगळे हेही होते.

खैरेंनीभरले परीक्षा शुल्क : बाळासाहेबठाकरे आयएएस अकादमीत प्रवेश मिळाल्यावर पुढचे मार्गदर्शन मोफत असले तरी आजच्या प्रवेश परीक्षेसाठी १२५ रुपये नोंदणी शुल्क ठेवण्यात आले होते. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता खासदार चंद्रकांत खैरे यांनी
सगळ्या ३२७ परीक्षार्थींचे नोंदणी शुल्क खिशातून भरले.

राज्यभर हजार विद्यार्थी
औरंगाबादच्याकेंद्राची विद्यार्थी क्षमता ५० आहे. अकादमीतर्फे राज्यात दरवर्षी हजार विद्यार्थ्यांना आयएएसच्या परीक्षेसाठी मार्गदर्शन दिले जाते.

व्हर्च्युअल क्लासेस
याअकादमीचे केंद्र शिवाई ट्रस्टच्या इमारतीत असून तेथे एका एसी साऊंडप्रूफ हाॅलमध्ये आठवड्यातून सोमवार, बुधवार शुक्रवार असे तीन दिवस सायंकाळी ते या वेळात वर्ग चालतात. ही व्हर्च्युअल क्लासरूम असून मुंबईच्या केंद्रांतून विविध विषयांचे नामवंत तज्ज्ञ फॅकल्टी म्हणून शिकवतात.

शिवविद्या प्रबोधिनीचा उपक्रम
बाळासाहेबठाकरे आयएएस अकादमी शिवविद्या प्रबोधिनीतर्फे चालवली जाते. शिवसेनेचे उपनेते विजय कदम अकादमीचे संचालक आहेत. तीन वर्षांपासून फक्त मुंबईपुरती असणारी ही अकादमी आता राज्यात औरंगाबादसह १६ ठिकाणी सुरू झाली आहे. मराठवाड्यात औरंगाबाद नांदेडला ती सुरू झाली आहे.

अशी होती प्रश्नपत्रिका
आजचीप्रश्नपत्रिका यूपीएससी परीक्षेच्या धर्तीवरच दोन तासांची २०० गुणांची होती. त्याच धर्तीवर उत्तरपत्रिकाही तयार करण्यात आल्या होत्या. हे पेपर मुंबईत तपासले जाणार असून आठवडाभरात निकाल जाहीर केला जाणार अाहे. "आयएएस'च्या मोफत कोचिंगसाठी ३२७ उमेदवार इच्छुक
बातम्या आणखी आहेत...