आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर व्यवसाय करात मिळू शकते अठरा हजारांची सूट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शासनाने प्रथमच व्यवसाय करात १८ हजार ३४० रुपयांची सूट जाहीर केली आहे. आठ वर्षांच्या कराऐवजी आता फक्त तीन वर्षांच्या कराची मुद्दल भरा अन् पाच वर्षांची करमाफी मिळवा असे या अभय योजनेचे वैशिष्ट्य आहे. या योजनेसाठी विक्रीकर विभाग जोरदार कामाला लागला असून ३० सप्टेंबरपर्यंत योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

काय आहे अभय योजना? : डॉक्टर,वकील, सनदी लेखापाल, कॉस्ट अकाउंटंट, विमा प्रतिनिधी यांना व्यवसाय कर सक्तीचा आहे. मात्र, अनेक जण हा कर भरत नसल्याचे शासनाच्या लक्षात आल्याने हे पाऊल उचलले आहे. एप्रिल ते ३० सप्टेंबर या कालावधीत नवीन करदात्यांनी जर नोंदणी केली असेल तर त्यांना तीन वर्षांचे रिटर्न भरावे लागेल. पूर्वी एकाच वेळी आठ वर्षांचा २५ हजार व्यवसाय कर भरावा लागायचा. या करारात १८ हजार ३४० रुपये माफ होऊ शकतात.

२४ कोटी वसूल - मागील वर्षी औरंगाबाद विभागातील दीड लाख करदात्यांकडून ७८ कोटी वसूल करायचे होते, त्यापैकी ६४ कोटी वसूल केले. यंदा मात्र उद्दिष्ट ८७ कोटी असून एप्रिल ते जुलै या कालावधीत २४ कोटींची वसुली झाली आहे.
बातम्या आणखी आहेत...