आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नियमित करभरणा केल्यास सुविधा उपलब्ध होतील

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - देशाची प्रगती साधण्यासाठी जास्तीत जास्त कर भरणे अपेक्षित आहे; परंतु देशातील आयकरदाते पाहिजे तसे रिटर्न्स भरत नाहीत. व्यापाऱ्यांनी नियमित करभरणा केला तर त्यातून सुविधा उपलब्ध करता येतील, असे मत आयकर विभागाचे प्रधान आयुक्त शिवदयाल श्रीवास्तव यांनी व्यक्त केले.

औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघ, टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, सीए असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा महसूल प्रबोधिनीच्या सभागृहात आयकर विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. या वेळी व्यासपीठावर सहायक कर आयुक्त डी. एन. पारीख, सहायक कर आयुक्त एम. के. सिंग, सहायक कर आयुक्त अभिजित हदगल, सीए असोसिएशनचे पंकज कलंत्री, औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अजय शहा, राजन हौजवाला आदी मान्यवरांची उपस्थिती होती. श्रीवास्तव म्हणाले की, व्यापाऱ्यांना व्यवसाय करणे सोपे राहिलेले नाही. आपली विक्री वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात; परंतु देशाच्या मूलभूत तत्त्वांमध्ये कराचा भरणा करणे नागरिकांचे दायित्व आहे. देशाच्या प्रगतीसाठी कराचा उपयोग केला जातो. कर चुकवणाऱ्यांच्या मनात कायम भीती असते, परंतु व्यापाऱ्यांनी आपला कर योग्यरीत्या भरला तर ती भीती राहत नाही. यासाठी व्यापाऱ्यांनी व्यवसायात विक्री वाढवणे गरजेचे आहे. स्वातंत्र्यानंतर पारदर्शकता, विचार, संशोधनातून कर वाढवू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच एका सर्वेक्षणात विदेशातील लोक सर्वाधिक कराचा भरणा करतात, परंतु त्या तुलनेत देशात अजूनही करदाते रिटर्न्स भरत नाहीत. या वेळी कराबाबत संभ्रम दूर करताना ते म्हणाले की, कर दिल्यानंतर कोणतेही नुकसान होत नाही.
व्यापाऱ्यांनी आपल्या क्षमतेनुसार कराचा भरणा करावा लागतो. जो कोणी कर भरणार नाही त्यावर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांची नजर राहते, असेही त्यांनी सांगितले. राजन हौजवाला यांनी सूत्रसंचालन केले.

एक लाख २० हजार नवीन करदात्यांचे उद्दिष्ट
शासनाने ठरवलेल्या धोरणानुसार देशात कोटी नवीन करदाते निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी औरंगाबाद जिल्ह्यात लाख २० हजार नवीन करदाते निर्माण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.