आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादसह जालन्यातील १४ हजार ९७१ मोठे व्यवहार आयकरच्या रडारवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मोदी सरकारने प्रत्येक शहरातील काळे धन शोधून काढण्याचे अवघड टार्गेट आयकर विभागाला दिले असून त्यासाठी ३० सप्टेंबरची डेडलाइन दिली आहे. या मोहिमेत औरंगाबाद आयकर विभागाने मोठे व्यवहार करणाऱ्यांवर बारीक नजर ठेवून त्यांचा डेटाबेस जमा केला आहे. जालना सर्कलसह औरंगाबाद जिल्ह्यात १४ हजार ९७१ मोठे व्यवहार झाल्याची नोंद आहे. या सर्वांना नोटिसा बजावण्यात येत असून ३० सप्टेंबरनंतर अघोषित संपत्ती काळे धन ठरेल आणि संबंधितांवर दंडासह फौजदारी कारवाई केली जाणार आहे.
जून ते ३० सप्टेंबरदरम्यान देशातील अघोषित उत्पन्न अर्थात काळे धन बाहेर काढण्याची मोठी मोहीम केंद्र सरकारने हाती घेतली आहे. याबद्दल सरकार जाहिरातींच्या माध्यमातून करदात्यांना अघोषित उत्पन्न घोषित करण्याचे आवाहन करत आहे. जे लोक अघोषित उत्पन्न घोषित करतील त्यांना ४५ टक्के इतका कर लागणार आहे. या लोकांची कोणतीही माहिती प्रसिद्ध अथवा शेअर केली जाणार नाही किंवा कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही, असे आश्वासन सरकारने दिले आहे. ३० सप्टेंबर रोजी मुदत संपल्यावर मात्र या अघोषित संपत्तीचे मूल्य चालू बाजार भावाने केले जाणार आहे. त्यावर व्याज, दंडासह फौजदारी कारवाईला सामोरे जाण्याची नामुष्की येणार आहे.
काय करावे लागेल संपत्ती घोषित करताना...
ज्यांच्याकडे मोठी रक्कम, मोठे आर्थिक व्यवहार, मोठी खरेदी केल्याची सरकारकडे नोंद नाही, त्यास काळे धन म्हणता अघोषित संपत्ती अशी व्याख्या सध्या सरकारने केली आहे; पण ३० सप्टेंबरनंतर अघोषित धनाची व्याख्या काळे धन म्हणून गणली जाऊन बाजारभावाने करवसुलीसह दंड अन् फौजदारी कारवाई होईल. हे टाळण्यासाठी ३० सप्टेंबरची डेडलाइन आयकर विभागाने करबुडव्यांना दिली आहे.

१) आयकर कार्यालयात जाऊन फॉर्म नंबर भरून द्यावा.
२) किंवा आयकर कार्यालयातील प्रधान आयुक्त -१ किंवा प्रधान आयुक्त- यांची भेट घेऊन आपल्या अघोषित संपत्तीविषयी माहिती देऊ शकता.
३) आपल्याकडे असलेल्या संपत्तीचे सर्टिफाइड व्हॅल्युअरकडून करून घ्यावे.
४) संपत्ती घोषित करताना व्हॅल्युअरचा रिपोर्ट अर्जासोबत देण्याची गरज नाही.
बॉक्स

दहा लाखांवरील व्यवहारांवर नजर
आयकर विभाग फायनान्स अॅक्ट १९७- सी नुसार दहा लाखांच्या वरचे कॅश डिपॉझिट, मोठ्या जमिनीची खरेदी, सोन्याची मोठी खरेदी, शेअर, म्युच्युअल फंड यांची मोठी खरेदी यांच्या नोंदी तीन ते चार मार्गांनी आयकर विभाग घेत आहे. यात नॉन फायलर सिस्टिम (एनएफएस), इंट्रॉगेशन अँड क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन (आयएनसीआय), फायनान्शियल इन्व्हेसमेंट युनिट ( एफ.ई.यू.) अशा प्रणालींचा वापर करून करबुडव्यांची कुंडली तयार केली जात आहे.

१४ हजारांवर मोठ्या व्यवहारांच्या नोंदी...
आयकर विभागाची नजर काळे धन शोधताना १० लाखांपेक्षा जास्त असणाऱ्या मोठ्या व्यवहारांवर अधिक बारकाईने आहे. जालना सर्कलमध्ये हजार ६०० मोठ्या व्यवहारांच्या नोंदी झाल्या आहेत, तर औरंगाबाद जिल्ह्यात हजार ३७१ मोठे व्यवहार झाले आहेत. यात औरंगाबाद शहरातील मोठ्या व्यवहारांचा आकडा अजून मोजण्याची प्रक्रिया सुरू आहे.

व्हर्जन..
स्वच्छ मनाने संपत्ती जाहीर करावी..
जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत आपल्याजवळील अघोषित संपत्ती लोकांना जाहीर करण्याची संधी सरकार देत आहे. ३० सप्टेंबरनंतर मात्र आमच्या डेटाबेसनुसार काळ्या धनावर बाजारभावाने कर, व्याज, दंड अन् शेवटी फौजदारी कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे घाबरता स्वच्छ मनाने आयकर विभागात येऊन फॉर्म नंबर भरावा किंवा ऑनलाइन भरावा. त्यांची माहिती गोपनीय राहील. कोणतीही कारवाई करता ती संपत्ती लीगल- कायदेशीर धरली जाईल.
- संदीपकुमार साळुंके, अप्पर आयकर आयुक्त.
बातम्या आणखी आहेत...