आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात प्राप्तिकरचे 17 ठिकाणी छापे, पाच जिल्ह्यांतून 13 कोटींचा काळा पैसा पकडला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबाद प्राप्तिकर विभागाने बँकांतील अकाउंटमधील काळ्या धनावर करडी नजर ठेवत मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत १३ कोटींचे काळे धन पकडले आहे. यात एकट्या औरंगाबाद शहरातील तीन मोठ्या कोचिंग क्लासमधून ५ कोटी काळे धन पकडण्यात आले. मार्चअखेरपर्यंत काळ्या धनाचा आकडा ८०० कोटींपर्यंत पोहोचेल, असा विश्वास प्राप्तिकर विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे.  
 
दिल्लीतील मुख्यालयातून महिनाभरापूर्वी मराठवाड्यातील बँक खात्यांची यादी आयकर विभागांना प्राप्त झाली आहे. ज्या खात्यांवरील रकमेबाबत संशय येत आहे, अशांना त्या संपत्तीचे विवरण मागवले जात आहे. अशा पद्धतीने ही धाडसत्रांची मोठी मोहीम १ मार्चपासून सुरू करण्यात आली. औरंगाबाद -८, जालना -२, वैजापूर-२, बीड-२, लातूर-३ अशा एकूण पंधरा धाडी घालण्यात आल्या. यात ८ कोटी रुपयांचा काळा पैसा पकडला. 
 
५ कोटींची रक्कम खासगी क्लासमधून जप्त  
या सर्व धाडीत मोठी कारवाई ही कोचिंग क्लासवर झाली आहे. त्यांच्याकडे येणाऱ्या पैशाचा स्रोत सांगता न आल्याने औरंगाबादमधून तब्बल तीन कोचिंग क्लासेसकडून पाच कोटी रुपये जप्त करण्यात आले. त्यांची नावे जाहीर करण्यास प्राप्तिकर विभागाने नकार दिला आहे.  
 
१ कोटी ३० लाखांचा सॅलरी अॅडव्हान्स  
बीडमधील एका उद्योजकाच्या खात्यावर १ कोटी ३० लाख रुपयांची सॅलरी अॅडव्हान्सची एंट्री बँकेच्या खात्यावर आढळली. पण यापूर्वी एवढी रक्कम कधीच त्या कंपनीने दिलेली नव्हती. यामुळे ही नोंद प्राप्तिकर विभागाच्या नजरेतून लपू शकली नाही. चौकशीत या पैशाचा स्रोत समाधानकारक सांगता न आल्याने तो सर्व पैसा काळ्या पैशाच्या यादीत पकडला गेला.
 
५० टक्के रक्कम गरीब योजनेत..  
पकडलेल्या या पैशातील ५० टक्के रक्कम ही पंतप्रधान गरीब योजनेत जाणार आहे, तर उर्वरित पन्नास टक्क्यांपैकी २५ टक्के रक्कम ही बँकेत चार वर्षांसाठी लॉक केली जाईल. त्यावर कर बुडवणाऱ्याला कोणतेही व्याज मिळणार नाही.   
 
बातम्या आणखी आहेत...