आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयकर धाडीच्या अफवेने बाजार बंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवना - कृषी सेवा केंद्र परवान्यासाठी कृषी पदवी, पदविका ही शैक्षणिक अर्हता निश्चित करण्यात आली आहे. केंद्र शासनाने घातलेल्या या जाचक नियमामुळे आैषध विक्रेत्यांमध्येे एकच खळबळ उडाली आहे. या बंधनकारक अटीतून जुन्या विक्रेत्यांना वगळण्यात यावे या मागणीसाठी पुकारलेल्या देशव्यापी बंदला पाठिंबा म्हणून मंगळवारी सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. यातच गुरुवारी सिल्लोड शहरात आयकर विभागाच्या पथकाने कारवाई केल्याच्या पार्श्वभूमीवर येथेही पथक दाखल झाल्याच्या अफवेने मुख्य बाजारपेठेतील इतर व्यावसायिकांनीही अघोषित बंद पुकारला होता. त्यामुळे गजबजलेल्या बाजारपेठेत भयाण शांतता पसरली होती.
केंद्र शासनाने कृषी दुकाने थाटण्यासाठी नवे नियम केले आहेत. बियाणे, खते, कीटकनाशके विक्री करणारा कृषी विषयातील पदवीधारक असावा ही या जाचक अटीतून जुन्या दुकानदारांना वगळावे या मागणीसाठी मंगळवारी बंद पाळण्यात आला. त्यात अनिल काळे, कुंदन गुप्ता, चंदन गुप्ता, संजय काळे, सय्यद जफर, राजेंद्र फरकाडे , विठ्ठल पालकर, अंकुश दांडगे, रवींद्र धनवई आदींनी केली.